Goa News: चतुर्थीच्या काळात फटाके वाजवण्यावर बंदी; उत्तर गोव्यातील संस्थेने जारी केले निर्बंध

जनहित याचिकेवरील सर्वोच्च न्यायालायाच्या निर्देशांनुसार निर्बंध जारी
Firecrackers are banned
Firecrackers are bannedDainik Gomantak
Published on
Updated on

Use of Fire-Crackers Restrained In Goa: उत्तर गोव्यातील एका संस्थेने चतुर्थीसह दिवाळी व इतर सणांच्या काळात फटाके वाजवण्यास निर्बंध घातले आहे. फटाके वाजवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाने एका जनहित याचिकेवर निर्देश जारी केले होते. त्या निर्देशानुसार 'सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स’ने निर्बंध जारी केले आहे.

Firecrackers are banned
NIA चा गोव्यात छापा; फोंडा तालुक्यातील अल्पवयीन मुलाचा मोबाईल घेतला ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके वाजवण्यासंदर्भातील निर्देशात म्हटले होते. नववर्ष स्वागताच्या काळात तसेच नाताळच्या काळात मध्यरात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे.

 त्या भागाचे पोलीस अधिकारी असे प्रकार घडल्यास जवाबदार राहतील असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याच मुद्द्याला धरुन 'सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स’ने निर्बंध जारी केले आहेत.

त्यानुसार चतुर्थीसह दिवाळी व इतर सणांच्या काळात रात्री 8 ते 10 असे दोन तास फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.

Firecrackers are banned
Goa School Jihad: राज्यातील 'स्कूल जिहाद' प्रकरण नेमकं काय आहे?

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. वृद्ध, आजारी लोकांनाही फटाक्यांच्या आवाजांचा त्रास होतो. तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी, भटके प्राणी मोठ्या आवाजाने घाबरतात व घाबरलेले पक्षी त्या भागातून कायमचे निघून जातात असे सोसायटीने सूचनेत स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com