Goa Accident Case: चार अपघातांत चौघांचा अंत : तिघेजण जखमी

Goa Accident Case: दुर्घटना सुरूच : मायणा-कुडतरीत दोन घटनांत दोघे ठार
Accident Cases in Goa
Accident Cases in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन भीषण अपघातांत दोघेजण मृत्युमुखी पडले.

धारगळमध्ये कारने पादचाऱ्यास उडविले, तसेच माजोर्डा येथे रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा अंत झाला.

Accident Cases in Goa
Goa Sunburn Festival: गोव्यात होणाऱ्या आशियातील सर्वात मोठा EDM महोत्सव 'सनबर्न फेस्टिव्हल' काय असतो?

केपेत ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात एक दाम्पत्य जखमी झाले. तर शिवोलीत स्वीगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीने ठोकरल्याने अरहाना मोतिवाला (वय १० वर्षे) हा मुलगा जखमी झाला.

16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास नुवे-डोंगरी जंक्शन नवीन बायपास रोडवर भीषण अपघात घडला.

माझिलवाडो-बाणावली येथील कॅस्ली रिबेलो (वय 21वर्षे) हा युवक ह्युंदाई कार घेऊन वेर्णा येथून मडगावच्या दिशेने जात असता, त्याची गाडी डोंगरी जंक्शनवर आल्यावर डोंगरीकडे जाणाऱ्या जुवांव कुतिन्हो (वय 68वर्षे, रा. माजोर्डा) यांच्या होंडा एव्हीएटर या दुचाकीला कारने जबरदस्त धडक दिली.

या अपघातात जुवांव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मात्र,

Accident Cases in Goa
Goa Tourism 2023: गोवा पर्यटकांसाठी खरंच असुरक्षित आहे का? गोव्यात फिरताना या टिप्स फॉलो करा....

उपचार सुरू असताना रविवारी सकाळी जुवांव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत लोटली येथील आग्नेल प्रायमरी स्कूलजवळ बुलेटला झालेल्या स्वयंअपघातात कुर्टी-फोंडा येथील नागराज वाडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला सहप्रवासी सादिक मोहम्मद अहीम (वय २२, रा. फोंडा) हा जखमी झाला आहे.

मायणा-कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.

रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू

माजोर्डा येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेचे नाव रोझा फर्नांडिस (वय ७७ वर्षे) असून ती मडगाव येथील कामत मीलन हॉटेलजवळील रहिवासी आहे.

हा अपघात रविवारी सकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास घडला, अशी माहिती मडगाव कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रीतेश गोवेकर पुढील तपास करीत आहेत.

केपेत दाम्पत्याला इजा

केपे : रविवारी केपे येथील दत्त मंदिराजवळ ‘हिट ॲण्ड रन’चे प्रकरण घडले. दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली असून धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराने पलायन केले.

मात्र, त्याचा मोबाईल तेथेच पडला. या अपघातात दाम्पत्याला दुखापत झाली, तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी केपे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com