Goa Politics: गावडे-तवडकर वादाचे पडसाद आज अधिवेशनामध्ये उमटणार!

Goa Politics: विरोधी आमदार घेरणार : आजपासून प्रत्यक्ष कामकाज
Govind Gaude & Ramesh Tawadakar
Govind Gaude & Ramesh Tawadakar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यातील वादाचे पडसाद उद्या, ता. 5 रोजी विधानसभा अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या पहिल्या दिवशी उमटण्याची शक्यता आहे. त्याला विरोधी आमदारांनीही दुजोरा दिला आहे.

सभापती तवडकर यांनी मंत्री गावडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधी पक्षाच्या हातात आयतेच कोलित सापडले आहे. शुक्रवारपासून अधिवेशनाला सुरवात झाली असली तरी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सलग दोन दिवस सुटी आल्याने प्रत्यक्ष कामकाज झालेले नाही. सोमवारपासून कामकाज सुरू होणार आहे. मात्र, शुक्रवारीच सभापती तवडकर यांनी आक्रमक होत, कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी खोतिगावातील एका वाड्यावर न झालेल्या कार्यक्रमासाठी २६ लाख रुपये मंजूर केल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे. सभापतींनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षाला आयतेच कोलीत मिळाले आणि त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विजय सरदेसाई यांनी, गावडे यांनी मंत्रिपद सोडण्याची मागणी केली होती. सभापतींनी केलेल्या आरोपामुळे भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आणखी काही बोलण्याची गरज आहे काय, असा सवाल युरी आलेमाव यांनी विचारला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मंत्री गावडे यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामारे जावे, अशी मागणी केली होती.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Banana Leaves: गोव्यात केळीच्या पानांचा का करतात वापर; जाणून घ्या फायदे...

गावडे यांनी जरी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयारी दर्शविली असली तरी विरोधी पक्ष सोमवारी काही गप्प बसणार नाही, हे स्पष्ट आहे. यापूर्वी गावडे यांच्यावर यापूर्वी कला अकादमी नूतनीकरणाच्या कथित निकृष्ट कामाविषयी गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळीसुद्धा या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून गावडे यांनी पदावरून पायउतार होण्याची मागणी केली होती. त्यामुळे कला अकादमी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रम निधी वाटपावरून गावडे यांच्यावर आरोप झाल्याने विरोधकांना सरकारवर गावडेंच्या माध्यमातून घेरण्याची आयतीच संधी मिळाली आहे.

विरोधक म्हणतात...

निधी वाटपप्रकरणी विरोधी आमदार म्हणून आमची मागणी गावडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची असली तरी प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळीच आमची निश्‍चित भूमिका स्पष्ट करू, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, तसेच ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Govind Gaude: गावडेंच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

राजकीय आरक्षणासाठी एसटी समाजाचा आज विधानसभेवर मोर्चा

१ अनुसूचित जमातीच्या (एसटी) समुदायाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी उद्या (५ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता मेरशी सर्कलकडून विधानसभेपर्यंत एसटी समाज संघटनेच्या वतीने भव्य शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनने ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे, त्यात ही माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘एसटी बांधवांनो जागे व्हा... ५ फेब्रुवारीचा दिवस समाजासाठी द्यावा. या शांती मोर्चात सहभागी व्हा. आम्ही एसटी होऊन २० वर्षे झाली. दरवर्षी हे सरकार आमचे २ हजार कोटी रुपयांची फसवणूक करते. आमच्या ३ हजार नोकऱ्या दिलेल्या नाहीत.

२ मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनने एसटी समाजावरील अन्यायाविरोधात हा मोर्चा काढण्याचे ठरले आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवूया. मुख्यमंत्र्यांनी गोवा विधानसभेत सभापतींना उत्तर दिले होते, आपण सर्व राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन राजकीय आक्षणाचा प्रश्‍न तडीस लावू, असे सांगितले होते. परंतु सरकार आमची फसवणूक करीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आमची मागणी मान्य करावी, त्यासाठी आम्हाला एसटी समाजाचा पाठिंबा हवा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com