
म्हापसा: बाप व लेकाने मिळून मूळ ओडिशा येथील एका कामगाराचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.७) रात्री ९ च्या सुमारास घडली. म्हापसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फोंडेक वाडो, पर्रा येथे मध्यमवयीन तरुण कामगाराचा मृतदेह पत्र्याच्या झोपडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या खुनाच्या घटनेनंतर अवघ्या सात तासांतच पोलिसांनी दोघांही संशयितांच्या मुसक्या आवळल्या
ओडिशामधील सत्या नबरांगपुरा (५०) व धाबिर नवरंगपुरा (३१) अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, फोंडेक वाडो-पर्रा येथे एका व्हिलाचे बांधकाम सुरू होते. या व्हिलाचे ते गवंडी म्हणून कामाला होते. या व्हिलाच्या शेजारीच बांधलेल्या पत्र्याच्या झोपडीत ते वास्तव्याला होते. तिथेच हा खूनाचा प्रकार घडला. तिघेही या झोपडीत एकत्रित राहायचे. सदर खून नेमका कुठल्या वादातून झाला, याचा पोलिस शोध घेत आहेत. मृताची अचूक ओळख अद्याप पोलिसांना पटवता आलेली नाही.
दरम्यान, पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक अजय धुरी, यशवंत मांद्रेकर, बाबलो परब, विराज कोरगांवकर तसेच सहाय्यक उपनिरीक्षक महेश शेटगांवकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत नाईक चोपडेकर, व इतर पोलिसांनी या खुनाच्या तपास व शोधकार्यात महत्वाची भूमिका बजावली.
गाठला क्रौर्याचा कळस
संशयित बाप-लेकाने धारदार शस्त्राने मयताचे डोके ठेचले तसेच पोट व गुप्तांग कापले. यातूनच संशयितांनी केलेल्या या खुनाची क्रूरता दिसते. खून केल्यानंतर, दोघे बाप-लेक घटनास्थळावरुन पसार झाले व जवळील शेतातच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत तिथे लपून बसले. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून, पहाटेच्या वेळी दोघाही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी म्हापसा पोलिसांनी भरपूर परिश्रम घेतले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.