विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारपासून आचारसंहिता लागल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शहरातील राजकीय बॅनर हटवण्याचे काम पालिका प्रशासन करीत असून मोठमोठे होर्डिंग वरील बॅनर हटविताना कर्मचाऱ्यांची बरीच दमछाक झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही बॅनर हटवण्याचे काम सुरूच आहे. मजबूत असल्याने बॅनरची चिरफाड तर काहींना काळा, निळा रंग फासण्याची पाळी कर्मचाऱ्यावर आली आहे.
गोव्यात निवडणूक (Election) आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या (Administration) कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी 3:30 वाजता आचारसंहिता लागू होताच विविध राजकीय पक्षांचे फलक, पोस्टर काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे. आचारसंहिता बाबतच्या सूचना पालिका आयुक्तांना पाठवण्यात आल्यानंतर, शनिवारीच पोस्टर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी मुरगाव (Mormugao) तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे फलक हटविण्यास प्रारंभ केला.
दरम्यान निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीची तारीख घोषित करताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय पक्षांचे बावटे व पोस्टर्स तसेच मोठमोठ्या होर्डींग्स वरील पोस्टर हटवण्यास सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या खऱ्या, मात्र सदर बॅनर, पोस्टर हटविताना कर्मचाऱ्यांची बरीच दमछाक झाली. कारण मुरगाव तालुक्यातील काही होर्डिंग्ज बॅनर्स अडगळीच्या ठिकाणी आहे. तसेच मोठमोठ्या होर्डिंगवर चिकटविण्यात आलेले बॅनर्स सुटून सुटेना. त्यामुळे अशा बॅनर्सची कर्मचाऱ्यांना चिरफाड करणे भाग पाडले. तर काहींना रंग फासण्याची पाळी कर्मचाऱ्यावर आली आहे.
आज तिसऱ्या दिवशी बॅनर्स हटवण्याचे काम चालू होते. काही ठिकाणी बॅनर चिरफाड केली जात होती तर काही ठिकाणी नेत्यांच्या तोंडाला रंग फासण्याचे काम चालू होते. दरम्यान केलेल्या पाहणीत मुरगाव तालुक्यात सर्वाधिक बॅनर्स तृणमूल काँग्रेसचे आहे त्यानंतर नंबर लागतो तो आप पक्षाचा. अजूनही सदर होर्डींगवरील बॅनर संपता संपेना. यात कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.