

मडगाव: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईक याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला तर अन्य दहाजणांच्या जामिनावर सोमवार, २९ डिसेंबर रोजी निवाडा होणार आहे.
या गॅंगवॉरप्रकरणी आतापर्यंत सोळाजणांना जामीन मंजूर झाला आहे. अमोघ याला ५० हजारांचा वैयक्तिक बॉण्ड व तितक्याच रकमेचे दोन स्थानिक हमीदार, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे, पुरावे नष्ट न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व अन्य अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अमोघ नाईकसह आणखी १० संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मागच्या आठवड्यात न्यायालयाने व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासू कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार, अक्षय तलवार या तेरा जणांना सशर्त जामीन मंजूर केला होता. तसेच दीपक कट्टीमणी व परशुराम राठोड या दोघांना पूर्वीच जामीन मंजूर झाला होता.
संघर्षातून टोळीयुद्ध : मुंगूल येथे १२ ऑगस्टला गँगवॉरची घटना घडली होती. एकूण २८ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्यातील व्हॅली व वॉल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते.
यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा या गँगवॉर प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने, या घटनेचे गूढ वाढले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.