Mumbai To Goa: मुंबई-पणजी AC बस सेवा कायम स्वरुपी सुरू राहणार, नऊ दिवसांत शिवशाही मालामाल

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा पर्यटकांनी गोवा आणि कोकणला अधिक पसंती दिली.
Mumbai To Goa
Mumbai To GoaDainik Goamantak
Published on
Updated on

Mumbai - Goa: गोवा नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थळ राहिले आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा पर्यटकांनी गोवा आणि कोकणला अधिक पसंती दिली. याकाळात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मुंबई-गोवा (Mumbai-Goa Bus) मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस (Shivshahi Bus) सेवा सुरू केली. दरम्यान, नऊ दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्राची ही बससेवा मालामाल झाली आहे. नऊ दिवसांत महामंडळाला चार लाख 36 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Mumbai To Goa
Manohar Airport: आनंदोत्सव! मनोहर विमानतळावर झाले पहिले व्यावसायिक लॅन्डिंग

नऊ दिवसांत मिळाले चार लाख 36 हजार उत्पन्न

महामंडळाने पर्यटन हंगामाच्या काळात मुंबई ते गोवा शिवशाही बससेवा केवळ नऊ दिवसांसाठी चालविण्यात आली. 25 डिसेंबर ते 02 जानेवारी या नऊ दिवसांत महामंडळाला चार लाख 36 हजार उत्पन्न मिळाले आहे. पहिल्या दिवशी बसला 50,470 रूपयांचे उत्पन्न मिळाले तर, अखेरच्या दिवशी 70 हजार रूपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे.

खासगी बसने प्रवाशी भाडे वाढविल्याने तसेच, ट्रेन देखील फुल्ल झाल्याने अनेक प्रवाशांनी एसटीने प्रवास करने पसंत केले.

Mumbai To Goa
Arabian Sea: अरबी समुद्रात आढळली दुर्मीळ ‘ब्‍लेनविल बिक’ माशाची प्रजाती

मुंबई-पणजी AC बस सेवा कायम स्वरुपी सुरू राहणार

प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई सेंट्रल - पणजी ही वातानुकूलित शिवशाही बस सेवा कायम स्वरुपी चालू ठेवली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. याशिवाय हीच बससेवा मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com