Khapreshwar Temple Tree: गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वडाचे मार्गदर्शक तत्वांनुसार स्थानांतर करा! हायकोर्टाचे निर्देश; ‘खाप्रेश्‍वर’च्या अस्तित्वाचा प्रश्‍न

Mumbai High Court Goa Ruling: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाप्रेश्‍वर देवस्थान येथील वटवृक्षाच्या स्थानांतरास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परवानगी दिली.
Mumbai High Court Approves Relocation of Sacred Banyan Tree
Khapreshwar Temple TreeDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai High Court Approves Relocation of Sacred Banyan Tree for Porvorim Flyover Project

पणजी: पर्वरीतील उड्डाण पुलाच्या बांधकामात अडथळा ठरलेले शेवटचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाप्रेश्‍वर देवस्थान येथील वटवृक्षाच्या स्थानांतरास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परवानगी दिली. तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वृटवक्षाचे स्थानांतर करण्याचे निर्देश संंबंधित अधिकाऱ्यांना देत अर्ज निकालात काढला. या आदेशामुळे या पुलाचा बांधकामामधील अडसर दूर झाला आहे. या वटवृक्षाच्या स्थानांतरानंतर तेथील घुमटीवजा मंदिराच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या पुलाच्या बांधकामामध्ये एकूण सहा जुनाट झाडांपैकी पाच झाडांचे स्थानांतर करण्यात आले होते व सहावे झाड असलेल्या वडाच्या ठिकाणी असलेल्या मंदिराच्या भाविकांनी ते कापण्यास तसेच त्याच्या स्थानांतरास विरोध केला होता. शिवोलीत झाडांची कत्तलप्रकरणीच्या जनहित याचिकेत ॲरॉन फर्नांडिस याने अर्ज करून पर्वरीतील सहा वटवृक्ष कापण्याला विरोध करणारा अर्ज सादर केला होता. त्याची दखल गोवा खंडपीठाने घेतली होती. या वटवृक्षांच्या स्थानांतराच्या प्रक्रियेबाबत तज्ज्ञांमार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला होता. त्यानुसार शिफारशींचा अहवाल सादर करण्यात आला.

Mumbai High Court Approves Relocation of Sacred Banyan Tree
Porvorim Flyover: गोंयकाराची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; या उड्डाणपूलाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

या अहवालात केलेल्या सर्व शिफारशी वन खात्याने स्वीकारल्या असून त्याची अंमलबजावणी संदर्भातचा आदेश जारी केला आहे. त्याची प्रत एजी देविदास पांगम यांनी खंडपीठाला सादर केली. या आदेशानुसार खंडपीठाने या वटवृक्षाचे स्थानांतर करणाऱ्या मे. डॉक्टर ट्री या एजन्सीला निर्देश देऊन अर्ज निकालात काढला. या वटवृक्षाच्या स्थानांतरापुरताच हा अर्ज असल्याने तेथे असलेल्या मंदिरासंदर्भात योग्य तो निर्णय सार्वजनिक बांधकाम खाते घेईल, असे स्पष्ट केले.

स्थानांतरीत होणाऱ्या वडाच्या फांद्याची छाटणी अहवालात नमूद उंचीनुसारच व्हावी. कमीत कमी फांद्यांची छाटणी केल्यानंतर त्वरित २४ ते ३६ तासात त्याचे तेथून स्थानांतर करावे. स्थानांतरापूर्वी त्याची माहिती वन खात्यासह संबंधित असलेल्या साबांखा, तज्ज्ञ पराग मोदी, याचिकादार याना मे. डॉक्टर ट्री एजन्सीला द्यावी. स्थानांतरावेळी तज्ज्ञ पराग मोदी व मे. डॉक्टर ट्री यांच्यात मतभेद झाल्यास वृक्ष अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. झाडाची देखभाल किमान पाच वर्षे संबंधित एजन्सीने करायची आहे.

Mumbai High Court Approves Relocation of Sacred Banyan Tree
Goa’s Porvorim Flyover: 'पर्वरी'तील डांबरीकरण कधी? धूळप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली? खंडपीठाने मागितला 'बार चार्ट'

भाविकांत चलबिचल

दरम्यान, पर्वरी (Porvorim) येथील ते वटवृक्ष हटवल्यानंतर तेथे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराचे काय, असा प्रश्‍न तेथील भाविकांसमोर उभा ठाकला आहे. या मंदिराच्या सभोवती असलेले शेड या वटवृक्षाबरोबर हटविले जाण्याची शक्यता आहे. ॲरॉन फर्नांडिस यांच्या अर्जावरील सुनावणीवेळी या मंदिराच्या अस्तित्वाबाबत उच्च न्यायालयाने कोणतेच निरीक्षण नोंदवलेले नाही. उच्च न्यायालयाने हे वटवृक्ष हटवण्यास मान्यता दिल्याने भाविकांत चलबिचल निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com