मुहूर्त ठरला! 'या' दिवशी मुंबई - गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्‍स्‍प्रेस, PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा

गोव्यात मडगाव रेल्वे स्थानक वंदे भारत एक्‍स्‍प्रेस ट्रेनच्या उद्घाटनासाठी सज्ज करण्यात आले आहे.
Mumbai Goa Vande Bharat Train Update |
Mumbai Goa Vande Bharat Train Update | Dainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Vande Bharat Train Update: मुंबई ते गोवा मार्गावर वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनची यशस्वी चाचणी काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. यशस्वी चाचणीनंतर आता वंदे भारत हायस्‍पीड ट्रेन मुंबई ते गोवा मार्गावर धावण्यास सज्ज झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला Video Conferencing च्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार असून, त्यापार्श्वभूमीवर गोव्यात मडगाव रेल्वे स्थानक ट्रेनच्या उद्घाटनासाठी सज्ज करण्यात आले आहे.

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनला 03 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी मडगाव स्थानकावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, 5 जूनपासून वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होणार आहे.

असा असेल मुंबई ते गोवा प्रवास

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल पुढे ठाणे, पनवेल, खेड असा प्रवास करत रत्नागिरीला सकाळी दहा वाजता ट्रेन येईल. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी ट्रेन गोव्यात मडगावला दाखल होईल.

Mumbai Goa Vande Bharat Train Update |
Goa Environment Film Festival: गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर लॉन्च, तीन दिवस 50 चित्रपटांची पर्वणी

गोवा ते मुंबई प्रवास

मडगाव येथून ट्रेन दुपारी 2 वा. 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. त्यानंतर रत्नागिरी, खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.

कोकणातही थांबा

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावला जाताना कणकवली येथे 11.20 वा ट्रेन पोहोचेल. तर, मडगाववरून मुंबइकडे जाताना 4.10 वाजता ट्रेन कणकवलीत थांबेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com