Goa Environment Film Festival
Goa Environment Film FestivalDainik Gomantak

Goa Environment Film Festival: गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर लॉन्च, तीन दिवस 50 चित्रपटांची पर्वणी

ओमान, पोर्तुगाल, फिनलंड, आर्यलंड, रशिया क्रोएशिया, स्पेन या देशातून पर्यावरणीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार
Published on

Goa Environment Film Festival: भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभुमीवर 3 जूनपासून पहिल्या गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सव पणजीत आयोजित केला आहे. या चित्रपट महोत्सवाचे पोस्टर आज पणजीत लॉन्च करण्यात आले. पर्यावरणमंत्री निलेश काब्राल आणि आयुक्त संजीत रॉड्रिग्स यांच्या हस्ते पोस्टर लॉन्च करण्यात आले.

Goa Environment Film Festival
Goa Environment Film FestivalDainik Gomantak

ओमान, पोर्तुगाल, फिनलंड, आर्यलंड, रशिया क्रोएशिया, स्पेन या देशातून पर्यावरणीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती संजीत रॉड्रिग्स यांनी दिली.

3 जून ते 5 जून या काळात हा महोत्सव होणार आहे. गोवा मनोरंजन सोसायटी, कांपाल येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवकाळात जगभरातील 50 हून अधिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. असेही रॉड्रिग्स म्हणाले. यासाठी मोफत नोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Goa Environment Film Festival
Sanquelim: वाळवंटीत 65 वर्षीय महिलेचा जीव देण्याचा प्रयत्न, नदीत उडी घेतली अन्...

येथे करा नोंदणी

सर्वांसाठी खुला असणाऱ्या या चित्रपट मोहत्सवासाठी मोफत असणारी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी www.goaeff.in या संकेतस्थळावर नोंदणी करने आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com