
रायगड: गेल्या १२ वर्षापासून अधिककाळ रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात या महामार्गावर पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणारी दुर्दशा सर्वांनाच ज्ञात आहे. अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. पण, मान्सूनपूर्व पावसाने देखील मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी या महामार्गावर साचले होते.
मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून वाहन चालक मार्ग काढताना दिसत होते. एव्हाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या प्रवाशांना या पावसानंतर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढवा लागत होता. याचा व्हिडिओ एका Instagram User ने शेअर केला आहे.
सनी महाडीक नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने मुंबई गोवा महामार्गावर साचलेले पाणी दाखवले आहे. नागोठाणे येथे रस्त्यावर तलावासारखे पाणी साचल्याचे त्याने म्हटले आहे. २० मे रोजी झालेल्या पावसात हे पाणी रस्त्यावर साचल्याचे त्यांने म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र मजेशीर कमेंट केल्या आहेत.
मुंबई गोवा महामर्गावरुन प्रवास करण्यासाठी आता स्पीड बोट घ्यायची का? असा सवाल एक युझरने उपस्थित केला आहे. तर, आता गाडीसोबत बोट देखील घ्यावी लागणार असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे. हा हायवे नाही तर गोव्यातील रिसॉर्ट आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली आहे.
दरम्यान, नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्व्हिस रोडसारखी प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधी न मिळाल्यास राज्य शासन स्वतः निधी पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.