पेडणे बोगद्यात रेल्वे रुळावर माती, कोकण रेल्वेच्या 3 एक्सप्रेस 4 तासांपासून रखडल्या
Konkan RailwayX Social Media

Konkan Railway: पेडणे बोगद्यात रेल्वे रुळावर चिखल, माती; कोकण रेल्वेच्या तीन एक्सप्रेस चार तासांपासून रखडल्या

Konkan Railway Update: सध्या रेल्वे कर्माचाऱ्यांकडून रुळांवरील माती व चिखल हटविण्याचे काम सुरु आहे.
Published on

गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, याचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे पेडण्यातील मालपे येथील बोगद्यात रेल्वे रुळावर चिखल, माती आल्याने गेल्या चार तासांपासून तीन एक्सप्रेस एका जागी थांबल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मालपे पेडणे येथील बोगद्यात माती साठल्याने तेजस, ऐर्नाकुलम आणि जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडी आणि कणकवली स्थानकांजवळ थांबवून ठेवल्या आहेत.

सध्या रेल्वे कर्माचाऱ्यांकडून रुळांवरील माती व चिखल हटविण्याचे काम सुरु आहे. काम कधी पूर्ण होईल याबाबत काही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेकांना रेल्वे का थांबविण्यात आल्या आहेत याबाबत काहीच कल्पना नाही.

पेडणे बोगद्यात रेल्वे रुळावर माती, कोकण रेल्वेच्या 3 एक्सप्रेस 4 तासांपासून रखडल्या
Goa Monsoon 2024: गोव्यात पावसाचे थैमान सुरुच! थिवीत घरांना पाण्याचा वेढा

पेडणे येथील घटनेबाबत अनेकांनी माहिती नसल्याने रेल्वे केव्हा धावणार असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. पण, रुळावरील माती हटवली जात नाही तोवर रेल्वे सुरु होणार नाही, असे नेटकरी व्यक्त होत आहे.

पेडणे बोगद्यात रेल्वे रुळावर माती, कोकण रेल्वेच्या 3 एक्सप्रेस 4 तासांपासून रखडल्या
Goa Politics: 'बालक' टीकेला 'पप्पू'ने उत्तर; गोव्यात भाजप काँग्रेस नेत्यांचे एक्सवर व्हर्बल वॉर

गोव्यात पावासाचा रेड अलर्ट देण्यात आला होता कोकण रेल्वेने प्रवाशांना याबाबत माहिती का दिली नाही. मी गेल्या दोन तासांपासून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर अडकून पडलीय. अशी एका नेटकरी महिलेने केलेल्या पोस्टवर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पेडणे येथील अपघाताची माहिती दिली तसेच बोगदा पूर्ववत होण्यासाठी दोन तासांचा वेळ लागेल असेही त्याने अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com