Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणाचा अहवाल सादर करा; हायकोर्टाचे निर्देश

NHAI सह महाराष्ट्राच्या सावर्जनिक बांधकाम विभागाकडून मागवला अहवाल
Mumbai-Goa Highway:
Mumbai-Goa Highway:Dainik Gomantak

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग तथा NH-66 च्या रूंदीकरणाबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

गेल्या महिन्यात NH-66 वरील बांधकामाधीन पुलाचा एक भाग कोसळळला होता. त्याबाबतही मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तज्ज्ञांच्या समितीचे निष्कर्षही मागवले आहेत. याचिकाकर्त्याने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती.

गेल्या महिन्यात तज्ज्ञांचे एक पॅनेल तयार करण्यात आले होते. समिती चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करेल.

Mumbai-Goa Highway:
Goa Accident: ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार रस्त्यावरून थेट जंगलात घुसली; शिवोली-म्हापसा मार्गावरील घटना

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या जनहीत याचिकेची सुनावणी झाली. चिपळूणचे रहिवासी आणि या महामार्गावरून नियमित प्रवास करणारे अॅड. ओवैस अन्वर पेचकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकार आणि NHAI ला निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

प्रवाशांना दैनंदिन प्रवासात जो त्रास होता त्यातून त्यांची सुटका करावी. या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत.

अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख निश्चित्त करावी आणि रूंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशा सूचना न्यायालयाने द्यावात, अशी मागणी केली आहे.

Mumbai-Goa Highway:
Goa Crime: विश्वासू नोकरानेच मालकाला घातला गंडा; तब्बल 23 लाख रुपये लुबाडले, पर्वरीत खासगी फर्ममधील प्रकार

2022 मध्ये, हायकोर्टाने असे निरीक्षण नोंदवले होते की, 2010 मध्ये सुरू झालेल्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाची गती निराशाजनक होती. त्यामुळे कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते.

या वर्षी जुलैमध्ये, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला खटल्याच्या खर्चासाठी 50000 रुपये खर्च द्यावा, असे NHAI आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले होते.

कारण याचिकाकर्त्याला महामार्गावरील दुरुस्तीशी संबंधित कामाच्या हमींचे अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याने अनेकदा न्यायालयात जावे लागले होते.

दरम्यान, 3 जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सद्यस्थिती अहवाल आणि समितीचा अहवाल मागवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com