Goa Monsoon 2023: राज्यात सध्या पावासाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काणकोण तालुक्यात झालेल्या पावासामुळे पैंगीण ते गालजीबाग मार्गावरील आदीव्हाळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे.
मुसळधार पावसामुळे सकाळपासून आदीव्हाळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास हा रस्ता ओलांडणे वाहनचालक व पादचाऱ्यांना धोकादायक ठरू शकतो.
यापूर्वी 02 ऑक्टोबर 2009 मध्ये काणकोणात पूर आल्यावेळी याच रस्त्यावरून एक रहिवासी वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतांत तुडुंब पाणी भरले आहे. गालजीबाग नदीचे पाणी किनारा ओलांडून वाहू लागले आहे.
राज्यात आज ''रेड अलर्ट''
दरम्यान, गोवा हवामान खात्याने आज (गुरुवारी) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 09 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्यात ''रेड अलर्ट'' जाहीर केला होता. मात्र, गुरुवारीही हवामान खात्याचे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
राज्य नियंत्रण कक्ष 08322419550 | उत्तर गोवा 08322225383 आणि दक्षिण गोवा 08322794100 या नंबरवर संपर्क साधता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.