Mumbai Goa Highway Accident: नियंत्रण सुटलं अन् घात झाला! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Mumbai Goa Highway Fatal Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून नेमळे येथे एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Mumbai Goa Highway Fatal Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Fatal Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून नेमळे येथे एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अपघातात गोव्यातील महिलेसह आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये गोव्याच्या नोंदणीकृत असलेल्या थारचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण थारने नेमळे मार्गावरुन कणकवलीच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान नेमळे येथे पोहोचल्यानंतर अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होऊन भीषण अपघाताची (Accident) शिकार ठरली. या अपघातामध्ये गाडीत स्वार असलेल्या श्रीमती नानोडकर (वय 58, रा. गिरी) आणि विलासिनी सातार्डेकर (वय 54, रा. भिरवंडे-कणकवली) यांना आपले प्राण गमवावे लागले. या दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai Goa Highway Fatal Accident
Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई- गोवा वंदे भारतला 'मान्सून'चा ब्रेक! आता दररोज नाही, आठवड्यात फक्त 'इतके' दिवस धावणार

या अपघातात गाडीचालक सनी नानोडकर (वय 36), उज्वला कांबळी (वय 48) आणि पांडुरंग नानोडकर (वय 65) हे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानेच हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com