मुळगावमधील स्मशानभूमीची दुरवस्था, अंत्यसंस्कारावेळी गैरसोय; शेडचे छप्पर पडले उघडे, कोसळण्याचा धोका

Mulgaon crematorium dilapidated condition: शिवलकरवाडा येथील स्मशानभूमीची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून या स्मशानभूमीतील शेडचे पत्रे उडून गेले आहेत.
Mulgaon
MulgaonDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिवलकरवाडा येथील स्मशानभूमीची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून या स्मशानभूमीतील शेडचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे शेड कोसळण्याच्या मार्गावर आहे. या शेडची त्वरित दुरुस्ती केली नाही तर पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो.

दुसऱ्या बाजूने शेडचे छप्पर उघडे पडल्याने या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन या स्मशानभूमीतील शेडच्या छपरावर पत्रे घालावीत, अशी मागणी होत आहे.

Mulgaon
Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

मुळगाव पंचायतीच्या प्रभाग-३ मध्ये येणारी ही स्मशानभूमी पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. गेल्या वर्षी या स्मशानभूमीत सुधारणा करण्यात आली होती. या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांचा साठा आणि अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांच्या आसऱ्याची व्यवस्था म्हणून बांधण्यात आलेल्या शेडच्या छपरावर पत्रे घालण्यात आले होते.

मात्र, पत्रे घालून दोन महिने होताच, सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच गेल्या नोव्हेंबर महिन्यात जोरदार वाऱ्यावेळी या शेडच्या छपरावरील सर्वच्या सर्व पत्रे उडून गेली आहेत. मात्र, आजपर्यंत शेडची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. शेडवरील उडालेली पत्रे अजूनही स्मशानभूमीजवळ पडून आहेत. त्यामुळे शेडची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

Mulgaon
Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

२३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार

स्मशानभूमीतील शेडचे पत्रे उडून गेल्यापासून आजपर्यंत एकूण २३ पार्थिवांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, उघड्या पडलेल्या शेडमुळे अंत्यसंस्कारावेळी लोकांना उघड्यावर आसरा घ्यावा लागत आहे, अशी खंत स्थानिक ज्ञानेश्वर परब यांनी व्यक्त केली. या स्मशानभूमीची झालेली दूरवस्था स्थानिक पंचायतीला कळविली आहे. मात्र, त्याबाबत पंचायत गंभीर नाही, असेही ज्ञानेश्वर परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com