Mulgao Mining Issue: '..तर जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार'! मुळगाववासीयांचा इशारा; खाणीच्या विळख्यातून मुक्त करण्याची केली मागणी

Zilla Panchayat Election: गावाला खाणीच्या विळख्यातून मुक्त करा. गावच्या अस्तित्वासाठी वेळप्रसंगी आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्यासही मागे राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ‘
Vote
VoteDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : ‘खाण’ प्रश्नी मुळगाववासीय आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. गावचे प्रश्न सोडवून गावाला खाणीच्या विळख्यातून मुक्त करा. गावच्या अस्तित्वासाठी वेळप्रसंगी आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्यासही मागे राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ‘खाणी’ ला आमचा विरोध नाही. मात्र गाव सांभाळा, अशी भूमिका मुळगाववासियांची आहे.

मुळगाव पंचायतीच्या गेल्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे आज मुळगाववासियांची बैठक झाली. मानसबाग-मुळगावच्या श्री धाईम देवाच्या मदिरात झालेल्या या बैठकीस सरपंच मानसी कवठणकर, उपसरपंच गजानन मांद्रेकर यांच्यासह अन्य पंचसदस्य तसेच देवस्थान, कोमुनिदाद, शेतकरी आदी ग्रामसंस्थांचे प्रतिनिधी मिळून जवळपास शंभर ग्रामस्थ उपस्थित होते.

यात महिलांची संख्या लक्षणीय होती. घरे, मंदिरे आदी नैसर्गिक संपत्ती खाण लीज क्षेत्रातूनबाहेर काढा. ‘बफर झोन’ प्रमाणे खाण सुरु करा. खाणीवरील रात्रपाळीचे काम बंद करा. ही मुळगावच्या ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे.

Vote
Mulgao: 'गावचे प्रश्न सुटत नसतील, तर खाण व्यवसाय काय कामाचा'! मुळगाव ग्रामस्थ आक्रमक; मैदानावरून पंचायत मंडळ धारेवर

गावचे प्रश्न सोडवण्यास खाण कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. उलट, खनिज व्यवसाय बेधडकपणे सुरु आहे. यासंबंधी स्थानिक पंचायतीने पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून आठ दिवसांची मुदत द्यावी. अन्यथा ग्रामस्थ खाणीवर धडक देतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Vote
Mulgao: "खाणीला आमचा विरोध नाही, पण बफर झोनप्रमाणे खाण सुरू करा" मुळगावासीयांची मागणी

गावचे प्रश्न सोडवण्यास कंपनी व्यवस्थापन आणि सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे कोमुनिदादचे अध्यक्ष महेशश्वर परब, सरपंच मानसी कवठणकर आणि पंचसदस्य तृप्ती गाड यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जैवविविधता समितीचे स्वप्नेश शेर्लेकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, गजानन मांद्रेकर, केशव परब, पुतूलो आदींनी विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com