Mulgao Mining: मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, मुळगाववासीयांचा निर्धार; खाणप्रश्न तापण्याची शक्यता

Mulgao Mining Issue Goa: जोपर्यंत गावच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार सोमवारी मुळगाव येथे झालेल्या बैठकीत मुळगाववासीयांनी केला आहे.
Mulgao Mining
Mulgao MiningDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मुळगावमधील खनिज खाणप्रश्न आता पुन्हा तापण्याची शक्यता वाढली आहे. जोपर्यंत गावच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार सोमवारी मुळगाव येथे झालेल्या बैठकीत मुळगाववासीयांनी केला आहे.

गावच्या अस्तित्वासाठी प्रसंगी जवळपासच्या खाणग्रस्त भागातील गावांना विश्वासात घेऊन जनआंदोलन उभारण्याचा विचारही या बैठकीत पुढे आला. अलिकडेच मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील ठरावांची नोंद करताना गफलत करताना करण्यात आलेली आहे, असा आरोप या बैठकीत करून या प्रकाराचा निषेधही करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील ठरावांची सात दिवसांच्या आत दुरुस्ती करुन बैठकीत ठरल्याप्रमाणे नोंद करावी. अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. तसे निवेदनही पंचायतीतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे,अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

Mulgao Mining
Goa Weather: पारा 33.6 अंशावर… अंगाची लाहीलाही! उष्म्याच्या तीव्र झळांनी गोमंतकीय हैराण

मुळगावमधील खनिज खाण प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत ता. १२ रोजी मुळगावमधील विविध ग्रामसंस्थांच्या प्रतिनिधींसमोर पर्वरी येथे विधानसभेत एक संयुक्त बैठक झाली होती. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोनचे सीमांकन करतानाच मुळगाववासीयांचे प्रमुख प्रश्न सोडवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी त्या संयुक्त बैठकीवेळी वेदांता (सेसा) कंपनीला दिले होते. त्या बैठकीत जे ठरले होते.

त्याची नोंदच झाली नसल्याचे निदर्शनास येताच मुळगाववासीय नाराज बनले आहेत. याप्रश्नी पुढील कृती निश्चित करण्यासाठी मुळगाववासीयांची एक बैठक श्री केळबाई मंदिरात बुधवारी सायंकाळी बोलावली होती. पंचसदस्य विशालसेन गाड, गजानन मांद्रेकर, सिद्धनाथ कलशावकर आणि तृप्ती गाड यांच्यासह विविध ग्रामसंस्थांचे प्रतिनिधीसह दोनशेहून अधिक लोक यावेळी उपस्थित होते.

शेतकरी समितीचे प्रकाश परब आणि जैवविविधता समितीचे स्वप्नेश शेर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या निर्णयाची माहिती देऊन प्रत्यक्षात ठरावांची नोंद केलेली नाही. असे सांगून लोकांनी गावच्या अस्तित्वासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.

Mulgao Mining
Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचा मोठा जोर!

जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही!

गावचे प्रश्न सोडवायचे असतील, तर बोर्डे गावासह शिरगाव, पिळगाव आणि मये या खाणग्रस्त पंचायत क्षेत्रातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने मोठे आंदोलन करण्यावाचून आता पर्याय नाही, असे माजी सरपंच वसंत गाड यांनी सांगून त्यासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन केले. संतोष केरकर यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीका केली. पुतुलो गाड, झिलू परब, नरेश परब, विजय मांद्रेकर आदींनी यावेळी आपले मत मांडले. जोपर्यंत गावचे प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसता कामा नये, असा विचार पुढे आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com