Mudukud Mobile Network Outage: संपर्क साधायचा कसा? मुडकूडमध्ये 20 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क ठप्प! नागरिकांची मोठी गैरसोय

Canacona Network Problem: काणकोण तालुक्यातील मुडकूड परिसरात गेल्या २० दिवसांपासून मोबाईल नेटवर्क सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
Mudukud Mobile Network Outage
Mudukud Mobile Network OutageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

चावडी: काणकोण तालुक्यातील मुडकूड परिसरात गेल्या २० दिवसांपासून मोबाईल नेटवर्क सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मोबाईल संपर्क तुटल्यामुळे परदेशात नोकरीनिमित्त असलेल्या नातेवाइकांशी संवाद साधणेही कठीण झाले आहे.

नेटवर्कअभावी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसत आहे.

Mudukud Mobile Network Outage
Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगोंदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई आणि स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी भगवत करमली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. करमली यांनी मोबाईल नेटवर्क सेवा लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.

Mudukud Mobile Network Outage
Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर जिओ कंपनीने नेटवर्क यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच सेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.