Tejasvi Surya: खासदार सूर्या यांची 'तेजस्वी' कामगिरी; पूर्ण केली आव्हानात्मक 'आयर्नमॅन' स्पर्धा

खासदार तेजस्वी सूर्या हे आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे देशाच्या संसदेतील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
MP Tejasvi Surya
MP Tejasvi SuryaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या आव्हानात्मक आयर्नमॅन स्पर्धेत मुंबईच्या निहाल बेग याने बाजी मारत आयर्नमॅन किताब जिंकला आहे. याच स्पर्धेत बंगळुरूचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी देखील उत्तम कामगिरी करत आव्हानात्मक आयर्नमॅन रिले स्पर्धा पूर्ण केली आहे. खासदार तेजस्वी सूर्या हे आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे देशाच्या संसदेतील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत.

खासदार सूर्या यांनी 'टिम न्यू इंडिया'चे नेतृत्व करत आयर्नमॅन रिले स्पर्धेत भाग घेतला. सूर्या यांनी 90 कि.मी सायकल चालवत या स्पर्धेत भाग घेतला. त्यांच्यासोबत त्यांचा साथिदार श्रेयस होसूर याने 1.9 कि.मी पोहणे या प्रकारात भाग घेतला. तर, अनिकेत जैन यांनी 21 कि.मी धावण्यात सूर्या यांना साथ दिली. सूर्या यांनी स्पर्धा पूर्ण केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यासह खासदार सूर्या आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत.

MP Tejasvi Surya
Ironman 70.3 Goa: मुंबईचा निहाल बेग ठरला 'आयर्नमॅन'; गतविजेत्या बिस्वरजित सायखोमला टाकले मागे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तेजस्वी सूर्या आणि त्यांच्या टिमच्या याबाबत स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फिट इंडिया या संदेशाचे आम्ही पालन करतो. असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

MP Tejasvi Surya
Mumbai: उद्योगपतीच्या पत्नीचा उद्योग! पतीला मुठीत ठेवण्यासाठी ज्योतिषाला दिले 60 लाख रूपये

यासह अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांदु यांनी देखी खासदार तेजस्वी सूर्या यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिट इंडियाचे स्वप्न आपण एकत्रपणे पुढे घेऊन जात, देशातील प्रत्येक कोपऱ्यात पोहचवू. खेळ आरोग्यदायी आणि आनंदी न्यू इंडियासाठी फायदेशीर ठरतील. असे पेमा खांदु यांनी म्हटले आहे.

MP Tejasvi Surya
Punjab: पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय, गाण्यात यापुढे दाखवता येणार नाही 'गन'

दरम्यान, मुंबईच्या निहाल बेग याने आयर्नमॅनचा किताब जिंकला आहे. तर, भारतीय लष्करात काम करणारे बिस्वरजित सायखोम यांनी 4 तास 37 मि. आणि 21 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. महिला गटात, स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीकने 05:10:46 या वेळेसह पहिला क्रमांक पटकावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com