Goa News: ‘ग्‍लोबल चेंबर ऑफ सारस्‍वत’, ‘जीआयएम’मध्‍ये सामंजस्‍य करार

ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत उद्योजक’ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) यांनी नुकताच साखळी येथील ‘जीआयएम’च्‍या प्रांगणात आयोजित खास कार्यक्रमात महत्त्‍वपूर्ण सामंजस्य करार केला.
Goa Swaraswat Samaj
Goa Swaraswat SamajDainik Gomantak
Published on
Updated on

‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत उद्योजक’ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) यांनी नुकताच साखळी येथील ‘जीआयएम’च्‍या प्रांगणात आयोजित खास कार्यक्रमात महत्त्‍वपूर्ण सामंजस्य करार केला.

Goa Swaraswat Samaj
Special Trains For Velankanni Onam: वालांकिनी फेस्त, ओनम उत्सवानिमित्त धावणार रेल्वेच्या खास प्रवासी गाड्या

‘जीआयएम’चे संचालक डॉ. अजित परुळेकर, डॉ. नागा, प्रोफेसर डॉ. अक्षय भट, संचालक सिद्धार्थ सिनकर, प्रवीण काकोडे, अनिरुद्ध वालावलकर, पद्मश्री काशिनाथ पंडिता, जगमोहन कौल, फुला कौल, अन्‍य प्राध्‍यापक, सारस्वत चेंबरचे इतर सदस्य या प्रसंगी उपस्‍थित होते.

Goa Swaraswat Samaj
Special Trains For Velankanni Onam: वालांकिनी फेस्त, ओनम उत्सवानिमित्त धावणार रेल्वेच्या खास प्रवासी गाड्या

‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत उद्योजक’ला डेटाबेस तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि धोरणात्मक दिशा देणे यासोबत ‘जीआयएम’ संशोधन प्रकल्पांवर सहकार्य करेल. तसेच ‘सारस्‍वत चेंबर’सोबत स्‍वतंत्र व्‍यवस्‍थापन विकास कार्यक्रम राबविण्‍यात येईल. गोव्यातील उद्योग, सामाजिक क्षेत्रात लौकिक मिळवणारे तसेच जागतिक स्तरावर विशेष योगदान देणाऱ्या सारस्वत समुदायाच्या सदस्यांचे भविष्‍यात मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्‍यात येणार आहे.

Goa Swaraswat Samaj
Indian Army : जवानांचे शापोरा किल्‍ल्यावर गिर्यारोहण

त्‍या माध्‍यमातून ‘सारस्वत चेंबर’ आणि ‘जीआयएम’साठी अनेक संधी खुल्या होतील. अशा कार्यक्रमांची ज्‍या-त्‍यावेळी संयुक्तपणे घोषणा केली जाईल. ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत’चे गोवा समन्‍वयक शिरीश पै आंगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com