Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Margao Kidnapping Case: मोतीडोंगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण! पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे; तपासकामाला वेग

Moti Dongor Kidnapping Case: मोतीडोंगर येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मडगाव पोलिस सध्या शोध घेत आहे. पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Published on

मडगाव: मोतीडोंगर येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मडगाव पोलिस सध्या शोध घेत आहे. पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाचा रोख ठेवला आहे.

मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( ता. ११ ) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केले होते. मागाहून पीडितेच्या वडिलांनी यासंबंधी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

अज्ञाताने आपल्या मुलीची अपहरण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ व गोवा बाल कायदा कलम ८ (२ ) अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

Goa Crime
Goa Crime: ..तुम्ही मनी लाँडरिंगमध्ये अडकलाय! तोतया CBI ऑफिसरने उकळले 18 लाख रुपये; पंजाबमधील एकाला अटक

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. त्या मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तिने शाळाही सोडली असून, ती घरकाम करीत होती, अशी माहिती मिळाली आहे. ती मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाच्या तपासकामात पोलिसांनी गोपनीयता ठेवली आहे.

Goa Crime
Goa Crime: 55 वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण! पारधी टोळीच्या म्होरक्यांना अटक; पुणे-पंढरपूर कनेक्शन उघड

दरम्यान, सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. मागच्या आठवड्यात कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणांचा छडा लावताना महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथून त्या मुलीची सुटका करून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यातील एकटा अल्पवयीन होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com