
फातोर्डा: मोती डोंगर, फातोर्डा परिसरात कोमुनिदादच्या जागेवर अनेक घरांची बेकायदेशीर उभारली आहेत, ही घरे कित्येक वर्षांपासून आहेत. आता ही घरे पाडण्याची तयारी कोमुनिदादने सुरू केली आहे. या प्रकरणी त्यांनी बैठक घेतली असून १ मार्च रोजी या घरावर हातोडा चालविण्यात येणार आहे.
मुंगूल येथील कोमुनिदादच्या जागेवर असलेली ३१ घरे या पूर्वीच पाडण्यात आली आहेत. मडगाव व फातोर्डा येथील कोमुनिदादच्या मालकीच्या जागेवर काही घरे असून गोवा अनधिकृत बांधकाम नियम कायदा २०१६ अंतर्गत दक्षिण गोव्यात प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी १ मार्च रोजी सर्व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती ही कारवाई करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वा दरम्यान ही मोहीम चालणार आहे.
यावेळी मामलेदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, नगरनियोजन खात्याचे अधिकारी, वन खाते अधिकारी या कारवाईवर देखरेख ठेवणार आहेत. तसा त्यांना आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी कोणाचाही न्यायालयात अर्ज प्रलंबित असल्यास त्यावर विचार करण्यात येणार नाही. असे सर्व अर्ज वळगण्याची कायद्यात तरतूद आहे. यासह अभयारण्य, सीआरझेड, डेव्हलपमेंट झोन, मोकळ्या जागा, सार्वजनिक जमीन या सारख्या भागातील अनधिकृत बांधकामे या कायद्याअंतर्गत नियमित केली जाणार नाहीत. हे सर्व आधीच कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
दक्षिण गोव्यात एकंदरीत कायद्यांतर्गत ५,१०५ अर्ज आले होते. गोवा अनधिकृत बांधकाम अधिनियम २०१६ अंतर्गत दोन्ही जिल्ह्यात १० हजारच्यावर अर्ज प्रलंबित होते. या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यातील तीन हजार अर्ज फेटाळण्यात आले आहेत आणि १ मार्च रोजी पाडण्यात येणाऱ्या फातोर्डा आणि मडगाव येथील या घरांचा यात समावेश आहे. या प्रकरणांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.