Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Gangster lawrence bishnoi: हणजूण पोलिस ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत.
Gangster lawrence bishnoi
Gangster lawrence bishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित सात जणांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. सातही जणांचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे सांगितले जात असून, ते पंजाब पोलिसांना हवे असणारे संशयित आहेत. लवकरच त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित सात जणांना हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विष्णू बिष्णोई याचा देखील समावेश आहे. पंजाब पोलिसांना विविध प्रकरणात हवे असणारे हे संशयित आहेत. हणजूण पोलिस ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत.

मार्च २०२३ मध्ये बिश्नोई टोळीशी संबंधित अट्टल गुन्हेगार पवन सोळंकीला राजधानी पणजीत अटक करण्यात आली होती. कॅसिनोत खेळताना पोलिसांनी सोळंकीला अटक केली होती.

Gangster lawrence bishnoi
Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

दरम्यान, बिश्नोई टोळीचा शार्प शूटर मयंक सिंग उर्फ ​​सुनील मीणा याला अझरबैजानमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. परदेशातून भारतात गुन्हे घडवणाऱ्या मयंक सिंगला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली, १० महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला भारतात आणण्यात आले आहे. झारखंड पोलिस आणि एटीएसने यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. मयंक सिंगवर झारखंड, बिहार, राजस्थान आणि हरियाणामध्ये ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Gangster lawrence bishnoi
Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

दुसरीकडे उत्तर प्रदेश टास्क फोर्सने बिश्नोई टोळीच्या शार्पशूटर रवी डौराला याला देखील अटक केली आहे. २३ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल, सात कार्ट्रिज आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली. मुझ्झफरनगर येथे ११ लाखांचा दरोडा, दिल्लीत २५ हजार रुपयांची चोरी आणि गोळीबार करुन ४.५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com