Mormugao: MPA ची ‘ती’ फाटके अजून का पाडली नाहीत? पालिका मंडळ बैठकीत गाजला विषय

Mormugao Port Gate: नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून आपल्याकडे टपाल येणे बंदच झाल्याचा स्पष्ट करून आपले अधिकार कोणते ते माहीत नसल्याचे उद्वेगाने म्हटले.
Mormugao Port Gate News
Mormugao Port Gate NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बायणा येथील दोन फाटकांचा विषय मंगळवारी मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत पुन्हा गाजला. पालिका मंडळाने ठराव घेऊनही ती का मोडण्यात आली नाही, असा संतप्त सवाल नगरसेवक दीपक नाईक यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारचा उपक्रम असलेली आस्थापने, प्राधिकरणे व नौदलाच्या वसाहतीतील सदनिकांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या ३३ टक्के भाडेपट्टी घेण्यासंबंधीच्या ठरावाचे काय झाले असा संतप्त सवाल नगरसेवक दामोदर नाईक यांनी विचारला. काल झालेल्या या खास बैठकीत काही प्रश्नांवर गरमागरम चर्चा झाली.

नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून आपल्याकडे टपाल येणे बंदच झाल्याचा स्पष्ट करून आपले अधिकार कोणते ते माहीत नसल्याचे उद्वेगाने म्हटले.

नगराध्यक्ष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, नगरसेवक, नगरसेविका, पालिका अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

त्या फाटकासंबंधी प्रश्न उपस्थित करताना दीपक नाईक यांनी ठरावाचे काय झाले असे विचारले. ठराव घेऊनही काहीच होत नसल्याने लोकांकडून हंसे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ती फाटके मोडलीच पाहिजेत.

रस्त्यालगतची अवैध बांधकामे पाडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना ती फाटके का मोडली जात नाही, असे विचारले. या प्रकरणी त्या फाटकांसंबंधी वाहतूक पोलिस निरीक्षकांचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्याचे ठरले.

प्रशासकीय काम पाहणे हे माझे अधिकार, असे मुख्याधिकारी सांगतात. त्यामुळे माझे अधिकार कोणते हे सांगा असे नगराध्यक्ष बोरकर यांनी विचारले. आपल्याकडे सध्या टपालही पाठविण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी नाईक यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.

काही वेळा माहिती हक्क अंतर्गत जी पत्रे येतात. त्यांना उत्तरे देण्यासाठी दिरंगाई होत असल्याने न्यायालय फटकारत आहे. त्यामुळे पालिका संचालनालयाने त्यासंबंधी त्वरित उत्तरे देण्याचे निर्देश दिले असल्याने आपण संबंधित विभागांना ती पत्रे पाठवितो, असे सांगितले. तथापी, टपाले येतात ती आमच्या नजरेखालून गेली पाहिजे.

Mormugao Port Gate News
Mormugao Port Authority: नव्या पुलावरचे 'ते' फाटक उघडेच राहणार, एमपीएचे आश्वासन; स्थानिकांनी व्यक्त केले समाधान

‘त्या’ ठरावाचे काय झाले? ः दामोदर नाईक

सरकारी उपक्रम असलेल्या कंपनी, प्राधिकरण, तसेच नौदलाच्या वसाहतीतील सदनिकांची ३३ टक्के घरपट्टी मुरगाव पालिकेला मिळाली पाहिजे. या प्रकरणी मुरगाव, वास्को, दाबोळी या तीन मतदारसंघांचे आमदार, मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यासंबंधी ठराव घेतला होता. त्याचे काय झाले असा प्रश्न दामोदर नाईक यांनी विचारला. तथापी, संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तसेच ते प्रवेश देत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नगराध्यक्ष बोरकर यांनी मागील मंडळांनी या प्रकरणी काहीच केले नसल्याने आता आम्हाला काही अडचणी येत असल्याचे सांगितले. या प्रकरणी गरमागरम चर्चा झाल्यावर संबंधितांना पत्र पाठविणे तसेच वेळप्रसंगी न्यायालयात आव्हान देणे असा ठराव घेण्यात आला.

Mormugao Port Gate News
Mormugao: कामगारांना धमकावू नका, अन्यथा कारवाई करणार! कचरा शुल्कप्रकरणी मुरगाव पालिका आक्रमक

मोकळ्या जागेत ‘ग्रीन लंग्स’

पालिक क्षेत्रातील मोकळ्या जागा शोधून तेथे ‘ग्रीन लंग्स’ची संकल्पना राबविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. येथील उड्डाण पुलाखाली व्हर्टिकल गार्डन तयार करण्यासंबंधी चाचपणी करण्यात आली. सुमारे १०० कोटींचा मार्केट प्रकल्प बांधण्यासाठी मुरगाव पालिकेकडून ना हरकत दाखला देण्यात यावा अशी विनंती आमदार साळकर यांनी केली होती. त्यासंबंधी चर्चा करण्यात येऊन दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केट प्रकल्प बांधताना संडे मार्केट, हॉस्पिसियो इमारत, पॅव्हेलियन, मार्केटच्या जागेचा वापर करण्यात यावा जेणेकरून भव्य मार्केट प्रकल्प उभा राहील, असे मत व्यक्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com