Goa: मांद्रे मतदार (Mandrem Constituency) संघातील डोंगर भागातील जमनीकडे (Land in Hill area) आता बिगर गोमंतकीयांचे (Non- Goan) लक्ष गेलेले आहे. विकासाच्या नावावर झाडे कापून डोंगर सपाट करून बांधकामे केली जातात, भविष्यात पुढील पिढीसाठी या जमिनी राखून ठेवण्याचे आवाहन मांद्रेचे आम आदमी पक्षाचे नेते वकील प्रसाद शहापूरकर (Mandrem AAP Leader Adv. Prasad Shahapurkar) यांनी स्थानिक पत्रकांकडे बोलताना केले.
प्रसाद शहापूरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, डोंगराचा भाग विकल्यानंतर हळू हळू विकासाच्या नावावर बांधकामे सुरु होणार. पूर्वी किनारी भागातील जमनींकडे लक्ष होते, त्या जमिनी संपल्या, आता डोंगरावरील जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत.
जंगलात कॉन्क्रीटीकरण झाले तर भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे, अशी भीती शहापूरकर यांनी व्यक्त केली. आता लोकांनी डोंगर सांभाळण्यासाठी संघटीत होवून एकत्रित यावे, लोकांची वस्ती ही डोंगराच्या पायथ्याशी आहे, गाव लोकवस्ती आहे. डोंगरावर आपण गेलात तर आपले गावाचे सौदर्याने नटलेले चित्र पहावयास मिळत आहे.
पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नागरिकांनी जमिनी विकत घेतल्या आणि दगडी कुंपणे, तारेची कुपणे पत्र्याची कुंपणे घालून पारंपारिक पायवाटा अडवण्याचा प्रकार झालेला आहे. डोंगरावर जेसीपी फिरवण्याचे काम चालू आहे. प्रकरण खूप पुढे पोचले आहे.
एक चौदाच्या उताऱ्यावर जमनिचा व्यवहार
काही नागरिकांनी मूळ जमिनीच्या कागदपत्रांची शहानिशा न करता एक चौदाच्या उताऱ्यावरील नावे पाहून जमिनीचे व्यवहार केले जातात. मूळ कागद्पत्राद्वारे जमीन एकाची असते तर एक चौदाच्या उताऱ्यावर गैरमार्गाने नावे चढवून जमिनी विकण्याचा प्रकार चालू आहे.
मान्द्रेत प्रकरण घडले
मूळ कागद पत्रावर जागा मूळ मालकाच्या नावावर आहे तर एक चौदाच्या उताऱ्यावर भलत्यांचीच नावे चढवून, देवूळ वाडा येथील एकाची ९० हजार चौरस मीटर जमीन एका मंत्र्याने विकत घेण्याचे प्रकरण उघडीस आले आहे, मूळ मालकांना या विषयी काहीच पत्ता लागु दिला नाही. या जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू आंब्याची झाडे आहेत. ही जमीन परस्पर विकण्याचे प्रकरण उजेडात आले आहे.
हा प्रकार क्लेशदायक आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली कागदपत्रे तपासून पाहण्याची गरज आहे, असे आपचे नेते प्रसाद शहापूरकर म्हणाले. मांद्रेचे डोंगर हे आमचे खाजे आहेत हे सुरक्षित राहिले तरच पाण्याची समस्या उद्भवणार नाही, प्रदूषण होणार नाही. आमचे जीवन आनंदमय पुढील पिढीला द्यायला हवा आता डोंगर सांभाळण्यासाठी एकत्रित येवूया असे आवाहन शहापूरकर यांनी आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.