वास्को: मुरगाव पालिका मंडळाची आज विशेष बैठक पार पडली. यावेळी सोपोकर वाढीचा प्रस्ताव, गोवा शिपयार्डच्या नवीन इमारतीला देण्यात आलेला ना हरकत दाखला, भटक्या गुरांचा बंदोबस्त, हातगाडे, स्टॉल्स इत्यादींचा सोपो कर,जन्म दाखला शुल्क आकारणी यावर चर्चा झाली. तसेच काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
( Mormugao Municipal Board held a special meeting today to discuss the tax hike )
यावेळी बोलताना मुख्याधिकारी म्हणाले की, दोन एनजीओकडून नगराध्यक्षांवर खोटे केले जात आहेत. तसेच व्यक्तीगत लक्ष्य करण्यात येत आहे याबाबत मुख्याधिकारी जयंत तारी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधितांविरोधात कारवाईसाठी पालिका मंडळाने योग्य तो ठराव घ्यावा जेणेकरून संबंधितांना न्यायालयात खेचणे सोपे जाईल. असे ते म्हणाले.
पालिका मंडळ बैठकीत मुरगाव पालिकेला पंधराव्या वित्त आयोगाकडून येणारा निधी मिळण्यास वेळ लागणार असल्याने पालिकेने स्वतःच्या निधीचा वापर करून काही कामगार घ्यावेत असा ठराव घेण्यात आला आहे. तसेच हातगाडे, स्टॉल्सधारकांचा सोपो कर वाढविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
गेली कित्येक वर्षे प्रतिमीटर पंधरा रुपये करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. व शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लोकांना जन्म दाखल्यासाठी 50 रुपये मोजावे लागतील. बायणा येथील ओल्ड पॉवरच्या जागेत व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे.
गोवा शिपयार्डसंबंधी गेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. परंतु त्यासंबंधीची कोणतीही नोंद इत्तिवृत्तांमध्ये नसल्याने दीपक नाईक व इतरांनी संताप व्यक्त केला. त्या बैठकीत आम्ही गोवा शिपयार्डचा ना हरकत दाखला मागे घेण्याचा ठराव एकमतांनी घेतला होता. त्यावेळी मुख्याधिकारी, पालिका अभियंते वगैरांनी आपली मते मांडली होती. त्यांची नोंदच झाली नसल्याचे दिसून आले. ना हरकत दाखला मागे घेण्यासंबंधी कायदा सल्लागाराकडून योग्य तो सल्ला घेण्यात आल्यावर त्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
पालिका नगराध्यक्ष लिओ रॉडरिग्ज म्हणाले की, गोवा शिपयार्डला जारी केलेल्या ताब्यासाठी भोगवटा रद्द केला जाईल. परंतु कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच. पालिकेने नवीन गोवा शिपयार्डच्या इमारतीला आधीच भोगवटा जारी केला आहे. परंतु नगरसेवकांनी एकमताने भोगावटा रद्द करण्याचा ठराव घेतला आहे. आम्हाला सर्व कायदेशीर पहावे लागतील आणि आम्ही गोवा शिपयार्डला दिलेला भोगवटा रद्द करू, परंतु कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच," असे रॉड्रिग्ज म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.