Landslide In Goa: मुरगावात महामार्गाच्‍या बाजूस दरड कोसळली! आमदार आमोणकरांकडून पाहणी

Mormugao Landslide: याच भागात काही वर्षांपूर्वी काही प्रमाणात डोंगराळ भागाचे भूस्खलन झाले होते
Mormugao Landslide:  याच भागात काही वर्षांपूर्वी काही प्रमाणात डोंगराळ भागाचे भूस्खलन झाले होते
Mormugao Landslide Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Landslide | Sankalp Amonkar

वास्को: मुरगावातील बोगदा-बामणावाडी-तारीवाडा राष्ट्रीय महामार्गाच्‍या बाजूस डोंगराळ भागातील दरड कोसळल्याने महामार्ग एका बाजूने बंद करण्यात आला. सुदैवाने अनर्थ टळला. तसेच मुरगाव बंदरातील अवजड वाहनांसह इतर वाहनांना महामार्गावर रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती सरकारी विभागाकडून देण्यात आली. दरम्‍यान, आमदार संकल्‍प आमोणकर यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पाहणी केली.

बोगदा येथील टेकडीवर असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमी लगतच्या खालील भागाच्या दरड कोसळली. याच भागात काही वर्षांपूर्वी काही प्रमाणात डोंगराळ भागाचे भूस्खलन झाले होते. शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सकाळी बोगदा-बामणावाडी-तारीवाडा महामार्गाच्या बाजूस असलेल्या डोंगराळ भागाचे भूस्खलन झाले.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन, मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, मुरगावचे पोलिस निरीक्षक धीरज देविदास, हवालदार अजित परब, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग बनविणारी कंपनी गॅमन इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Mormugao Landslide:  याच भागात काही वर्षांपूर्वी काही प्रमाणात डोंगराळ भागाचे भूस्खलन झाले होते
Landslides In Goa: भूस्खलन नैसर्गिक की मानवनिर्मित? उपाययोजना अत्यावश्यक

संकल्प आमोणकर, आमदार

बोगदा-बामणावाडी-तारीवाडा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस डोंगराचा धोका लक्षात घेऊन तेथे संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे. यासाठी सोमवारी २६ ऑगस्‍ट रोजी सकाळी या भागाची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com