Mormugao: 14 कोटी खर्चून नूतनीकरण! उदघाटन कधी? मुरगाव पालिकेच्या इमारतीवरून चर्चांना उधाण

Mormugao Municipal Council: मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण काम पूर्ण झाल्याने सदर इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या इमारतीचे उद्‍घाटन होत नसल्याबद्दल येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Mormugao Municipal Council New Building
Mormugao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao Municipal Council New Building

वास्को: मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण काम पूर्ण झाल्याने सदर इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या इमारतीचे उद्‍घाटन होत नसल्याबद्दल येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या इमारतीचे उद्‍घाटन होत नसल्याने सुमारे चार वर्षापूर्वी बायणा येथील रवींद्र भवनात स्थलांतरीत केलेली उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालये पूर्ववत मुरगाव पालिका इमारतीमध्ये पूर्ववत आणण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

रवींद्र भवनातून सदर कार्यालये हलविण्यासाठी रवीद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांच्याकडून सतत दबाब येत आहे. सदर कार्यालये असल्याने रवींद्र भवनची आर्ट गॅलरी व इतर दालनांचा वापर करता येत नाही.

मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचे काम मार्च २०२१ मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा वापर करण्याचा निर्णय मुरगाव पालिका मंडळाने घेतला होता. वास्कोचे तत्कालीन आमदार कार्लुस आल्मेदा यांनी याकामी पुढाकार घेतला होता.

Mormugao Municipal Council New Building
Mormugao Port: 'खासगीकरणामुळे अनेक समस्या'; मुरगाव शिष्टमंडळाचे केंद्रीयमंत्री सोनोवाल यांना निवेदन

सदर काम सुरू करण्यापूर्वी या इमारतीत असलेले म्युनिसिपल हायस्कूल, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, कोमुनिदाद, अबकारी, सब ट्रेझरी , कँटिन , बीएसएनएल, नागरी पुरवठा व इतर कार्यालये तसेच आरोग्य खात्याचे लसीकरण, मलेरिया, फालेरिया विभाग दुसरीकडे हलवण्यात आले होते. सुमारे चौदा कोटी खर्चून या इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

Mormugao Municipal Council New Building
Mormugao: मुरगाव पालिकेवर ‘कचऱ्या’चा भार! विक्रेते बुडवतात शुल्क; रस्त्यालगत अस्वच्छतेचे साम्राज्य

उद्‍घाटन कुणासाठी खोळंबले?

रवींद्र भवनात उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालये हलविण्यात आल्याने गरजूंना शहर भागात मिनीबसमधून उतरून बायणाकडे जाणारी दुसरी बस धरावी लागते. यामध्ये वेळ व पैशांचा अपव्यय होतो. यासाठी सदर कार्यालये लवकरात लवकर पूर्ववत मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या इमारतीचे सर्व कामे झाली असेल, तर उद्‍घाटन का होत नाही. कोणासाठी सदर इमारतीचे उद्‍घाटन खोळंबून राहिले आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com