Morlem Water Treatment Plant : मोर्लेत जलशुद्धीकरण प्रकल्प; चार पंचायतींची पाणी समस्या सुटणार

Morlem Water Treatment Plant : जलस्रोत खात्याकडून जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण
Morlem  Water Treatment Plant
Morlem Water Treatment PlantDainik Gomantak

Morlem  Water Treatment Plant :

पिसुर्ले, पर्ये मतदारसंघातील पाणीपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पावले उचलली असून नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून येथील पाणी समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मोर्ले न्यू कॉलनी येथील सामाजिक सभागृहाजवळ नव्या शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.

जलस्रोत खात्याच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पात वाळवंटी नदीतील पाणी खेचून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. जलस्रोत खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल.

Morlem  Water Treatment Plant
Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

या प्रकल्पांचे प्राथमिक स्तरावरील बांधकाम पूर्ण होत आले आहे. मोर्ले येथील वाळवंटी नदी ते प्रकल्पापर्यंत भली मोठी जलवाहिनी घालण्यात आली आहे.

बाकी कामेही पाणीपुरवठा विभागाने लवकर पूर्ण करावीत व या प्रकल्पाचे लोकार्पण व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

या प्रकल्पामुळे पर्ये मतदारसंघातील चार पंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. तसेच ज्या भागात पाणी समस्या आहे, तेथील समस्याही सुटणार आहे. पर्ये मतदारसंघातील काही भाग हे उंचाववर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आहेत, कमी क्षमता आणि दाबामुळे तिथेपर्यंत पाणी चढत नव्हते, त्यामुळे या भागांना पाण्याची समस्या भेडसावत असे, ही समस्या आता सुटणार आहे.

Morlem  Water Treatment Plant
Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

या पंचायतींना लाभ

पर्ये मतदारसंघातील मोर्ले, पर्ये, पिसुर्ले व होंडा या चार पंचायत क्षेत्रातील नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. येथील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे. तसेच पाणी समस्या असलेल्या भागांतील पाण्याची समस्या सुटणार आहे.

मोर्ले येथे उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे चार पंचायतींना फायदा होणार आहे. वाढलेल्या लोकवस्तीमुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण पडत होता, त्यामुळे नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होतील.

- डॉ. दिव्या राणे, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com