Morlem Lineman Death: सरकारच्या निष्काळजीपणामुळे बळी! लाईनमनच्या मृत्यूनंतर पाटकरांची टीका; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Amit Patkar: वीज खात्याने काहीच बोध घेतलेला दिसत नाही. मूलभूत प्रोटोकॉलशिवाय धोकादायक परिस्थितीत कामगारांना कसे काय पाठवले जाते, असा सवाल पाटकर यांनी केला आहे.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सत्तारीतील मोर्ले येथील लाईनमन चंद्रू गावकर यांचा झालेला मृत्यू हा सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेला असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

वीज कर्मचाऱ्यांचा अशाप्रकारे जीव जाणे यामागे पूर्णपणे सरकारचा बेफिकीरपणा दिसून येत तर आहेच परंतु मागील घडलेल्या घटनेतून वीज खात्याने काहीच बोध घेतलेला दिसत नाही. मागील एका अशाच घडलेल्या घटनेनंतर वीज मंत्र्यांनी कामगारांना सर्व सुरक्षेची उपकरणे पुरवली जात असल्याचे म्हटले आहे.

परंतु मोर्लेतील घटनेनंतर खरोखरच सरकार कामगारांना सुरक्षा उपकरणे पुरवते का, असा प्रश्न पडतो. त्याशिवाय मूलभूत प्रोटोकॉलशिवाय धोकादायक परिस्थितीत कामगारांना कसे काय पाठवले जाते, असा सवाल पाटकर यांनी केला आहे. आज घडलेली घटना ही अचानक घडलेली नाही, तर सरकारच्या निष्काळजीने घडवलेला प्रकार आहे, भाजपच्या नेतृत्वाखालील झोपलेल्या प्रशासनाला जागे होण्यापूर्वी आणखी किती निष्पाप जीव गमवावे लागतील,असाही सवाल त्यांनी केला.

Amit Patkar
Goa Drowning Death: गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे का? 11 दिवसांत 7 जण बुडाले, राज्य सरकारकडून सुरक्षेच्या उपायांची गरज

स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा!

सरकारने जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून या घटनेची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी, मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना त्वरित पुरेशी भरपाई द्यावी, कडक सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी आणि वीज विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी संरक्षक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, सर्व विभागीय सुरक्षा उपायांचे ऑडिट करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com