Morjim: ऐनवेळी 'अभंग वारी'ला ब्रेक! प्रशासनाच्या निर्णयामुळे तुये-पार्सेत रसिकांचा हिरमोड

Abhang Wari Abhang Repost event restricted: सुरेश रैना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग वारी-अभंग रिपोस्ट’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमावर ऐनवेळी प्रशासनाचा निर्बंध लागला.
Abhang Wari Abhang Repost event restricted
Abhang Wari Abhang Repost event restrictedDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: तुये-पार्से येथील श्री सातेरी भगवती कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने शनिवारी (ता. १०) सायंकाळी ७ वाजता सुरेश रैना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग वारी-अभंग रिपोस्ट’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमावर ऐनवेळी प्रशासनाचा निर्बंध लागला.

आवश्यक शासकीय परवानग्या व विविध खात्यांचे ‘ना हरकत दाखले’ उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा आदेश पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी दिला.

कार्यक्रमासाठी गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो रसिकांनी आगाऊ पास घेतले होते. मात्र ऐनवेळी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा झाल्याने रसिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.

Abhang Wari Abhang Repost event restricted
Goa Police Recruitment: उपनिरीक्षक पदांसाठीची अंतिम सीबीटी 25 रोजी, परीक्षेसाठी दोन्ही जिल्‍ह्यांतील केंद्रेही निश्‍चित

दरम्यान, दुपारी कार्यक्रमस्थळाजवळील माळरानावर सुक्या गवताला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. नाईक यांनी सांगितले की, लईराई जत्रोत्सवातील दुर्घटना व हणजूण येथील ‘बर्च फायर’ प्रकरणानंतर मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांबाबत अधिक दक्षता आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com