
मोरजी: पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असली तरी मोरजी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा या समुद्रकिनारी चेंजिंग रूम, शौचालय, पार्किंग व्यवस्था या सोयींकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सरकारने या सोयीसुविधांकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी माजी सरपंच तथा विद्यमान पंच आणि व्यावसायिक पवन मोरजे यांनी केली.
यासंदर्भात, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना विचारले असते ते म्हणाले, की लोकांच्या मागणीनुसार सर्व प्रकारच्या सोयी सुविधा सरकार पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही राज्यात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतो. त्यांना होणाऱ्या गैरसोयी सरकार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे, माजी सरपंच पवन मोरजे म्हणाले की, किनाऱ्यावर सध्या जो शौचालय प्रकल्प आहे. त्याची स्थिती भयानक झालेली आहे. इन्फॉर्मेशन सेंटर आहे. त्या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. सरकारने यंदा या किनाऱ्यावर मोबाईल शौचालयाची सोय करायला हवी. आपणही पंचायतीमार्फत सरकारला पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, टेंबवाडा किनाऱ्यावर सरकारने पार्किंग प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याचे कामही सुरू झाले. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने सरकारला आम्ही विनंती करतो की सरकारने कायदेशीर प्रकल्पाला प्राधान्य द्यावे. तसेच बेकायदेशीर कुठलेही काम करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्याचा फटका येथील पर्यटकांना आणि व्यावसायिकांना बसतो, असे पवन मोरजे यांनी सांगितले.
सीसीटीव्ही नाहीत
मोरजी किनाऱ्यावर सुरक्षेचा प्रश्न उद्भवत आहे. येथे सीसीटीव्ही नाहीत. काही पर्यटक आपली वाहने थेट किनाऱ्यावर नेतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचीही कमतरता आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ध्वनी प्रदूषण करण्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोणत्याच प्रकारची जागृती केली जात नाही. किनाऱ्यावर जाणारे रस्ते अरुंद व धोकादायक बनले आहेत. या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक अल्बर्ट डिसोझा यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.