Morjim Casino: मोरजीत सात मजली इमारतीत 'कॅसिनो'चा घाट, स्थानिकांचा कडाडून विरोध

Morjim residents protest against proposed casino: मोरजी पंचायत क्षेत्रातील कान्नाईक वाडा परिसरात १२९ खोल्यांची सात मजली भव्य इमारत उभी राहत आहे. त्या हॉटेल इमारतीत कॅसिनो सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्या कॅसिनोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवून ग्रामसभेत ठराव मंजूर केला.
Morjim Panchayat Gramsabha
Morjim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Panchayat Gramsabha Opposes Casino

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील कान्नाईक वाडा परिसरात १२९ खोल्यांची सात मजली भव्य इमारत उभी राहत आहे. त्या हॉटेल इमारतीत कॅसिनो सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्या कॅसिनोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवून ग्रामसभेत ठराव मंजूर केला. हा ठराव संबंधित खात्याला आपण पाठवणार असल्याची माहिती यावेळी सरपंच पवन मोरजे यांनी दिली.

कान्नाईक वाडा मोरजी येथील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. विनोद पेडणेकर, विकी जोशी, मयूर शेटगावकर, भालचंद्र टेंबकर श्री मोरजे, आदींनी हा प्रकल्प नको असल्याचे जाहीर करत सर्व ग्रामस्थांनी विरोध दर्शवून हा ठराव मंजूर करण्यास संमती दिली.

यावेळी उपसरपंच सुप्रिया पोके, पंच रजनी शिरोड, पंच सदस्य मुकेश गडेकर, विलास मोर्जे, मंदार पोके, फटू शेटगावकर ,सुरेखा शेटगावकर स्वप्निल शेटगावकर आदी उपस्थित होते .सुरुवातीला पंचसचिव सचिन कवठणकर यांनी स्वागत आणि गत सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले.

Morjim Panchayat Gramsabha
Ranbir Kapoor at IFFI 2024: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

‘सीआरझेड’ने स्थानिकांना मुभा द्यावी!

यावेळी ग्रामस्थ जेम्स यांनी किनारी भागात जी पारंपारिक घरे आहेत, ती घरे दुरुस्त करून काहींनी व्यवसाय सुरू केलेला आहे. परंतु ‘सीआरझेड’ मध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा कायदा आहे.परंतु जे स्थानिक पारंपरिकरित्या ज्या घरात राहतात. तिथे सीआरझेड ने घर दुरुस्तीसह विस्तारित बांधकाम व व्यवसायास मुभा द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com