Morjim: सदर पूल येत्या चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला करण्याचा मानस असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले
Morjim Mini BridgeDainik Gomantak

Morjim Mini Bridge: ..अखेर मोरजी येथील नव्या पुलाचे काम सुरू!

Morjim: सदर पूल येत्या चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला करण्याचा मानस असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले
Published on

मोरजी,ता. ६ (प्रतिनिधी ) ः मोरजी पंचायत क्षेत्रातील पंडिरवाडा येथील जुना मिनी पूल गेल्या पावसाळ्यात खचला होता. त्या पुलाच्या उभारणीचे काम जोरदार पावसामुळे रखडले सध्या ते सुरू झाले आहे.

गेल्या पावसाळ्यात हा पूल खचल्यानंतर या ठिकाणी नवा पूल उभारावा,अशी स्थानिकांची मागणी होती. गेल्या पावसाळ्यात हा पूल सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर वर्षभरात नव्या पुलासाठी प्रयत्न झाले नाहीत. परंतु जूनमध्ये पुलाविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन आमदार जीत आरोलकर यांनी या पुलासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले.

सदर पूल येत्या चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला करण्याचा मानस असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

Morjim: सदर पूल येत्या चतुर्थीपूर्वी वाहतुकीस खुला करण्याचा मानस असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले
Morjim Beach: किनाऱ्यावर गार्डन उभारण्यास विरोध, नवीन पार्किंगलाही आक्षेप

नवीन पूल उभारणीस शुभारंभ केला. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे काँक्रीटचे काम शिल्लक होते. त्या संदर्भात नुकतीच या पुलाविषयी वृत्त प्रसिद्ध होऊन पूल चतुर्थी पूर्वी तरी सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्या वृत्ताचीही आमदार जीत आरोलकर यांनी दखल घेऊन हा पूल लवकरात लवकर काँक्रीटरी घालून पुलाला सुरुवातही करण्यात आली. हा पूल आता चतुर्थी पूर्वी खुला होणार. त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

मोरजीचे सरपंच मुकेश गडेकर यांनी सांगितले,की पुलाविषयी पंचायत निधी मधूनही काम हाती घेण्यात यावे,यासाठी पंचायतीने प्रयत्न केले. परंतु गट विकास कार्यालयातून तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आमदार जीत आरोलरकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून या पुलाच्या कामाला गती मिळवून दिली. शिवाय स्थानिक पत्रकारांनी आवाज उठवल्यामुळे हा पूल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com