Mumbai-Goa Highway : मालपेत महामार्गावर दरड कोसळणे थांबता थांबेना ़!

रस्ता वाहतुकीला बंदच ः संरक्षक भिंतीच्या सुरक्षेबाबतही चिंता; वाहतूकदारांतही भीती
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय महामार्ग 66 वरील मालपेतील बगलरस्त्यालगत भली मोठी टेकडी आहे. त्या टेकडीची दोन्ही बाजूने दरड कोसळत असून, ती थांबता थांबेना,अशी स्थिती झाली आहे. आठ दिवसांपूर्वीही दरड कोसळली होती. आता पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे बांधलेली संरक्षक भिंत सुरक्षित राहील की नाही? याची शंका येऊ लागली आहे.

मालपे येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा बगलरस्ता काँक्रीट करून पूर्ण झाला असताना तिथे दोन्ही बाजूच्या टेकडीवरील दरड मोठ्या प्रमाणात कोसळून मोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत, रस्त्यावर मातीचे ढिगारे बनलेले आहेत. रस्ता जरी पूर्ण वाहतुकीसाठी खुला झाला नसला तरी हा रस्ताही धोकादायक बनला आहे.

Mumbai-Goa Highway
Morjim News : भूमिगत वीजवाहिनीचे काम झाले, आता रस्ते कधी सुधारणार?

या राष्ट्रीय महामार्ग बगलरस्ता करत असताना डोंगर कापणी कशी केली असेल, यावर अभियंत्याचे कसे काय लक्ष राहिले नाही,अशी विचारणा होत आहे. सरळ रेषेत डोंगर कापल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळत आहे. एका बाजूने भले मोठे दगड मातीच्या ढिगाऱ्याबरोबर रस्त्यावर आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने भुसभूशीत माती कोसळत असून दोन्ही डोंगर भविष्यात धोकादायक बनतीलच, शिवाय रस्ता वाहतुकीस खुला झाल्यानंतर एखादेवेळी दरड कोसळली तर मोठे अपघात घडू शकतात. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

म्हणून संरक्षक भिंतीच्या कामातही अडसर

महामार्गावरील दरड कोसळणे काही थांबलेले नाही, त्यामुळे संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला गतीही मिळालेली नाही. कामगार कधी ही भिंत बांधून संपणार याची प्रतीक्षा करताना दिसतात. तर एका बाजूने धो धो पाऊस कोसळत असल्याने डोंगरातूनच झरे फुटल्याने मोठ्या प्रमाणात या डोंगर दरडी बरोबरच पाणीही वाहून जात आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे काम करता येत नाही. दरड कोसळलेली, दरड पाहता रस्ता पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र दिसते.

Mumbai-Goa Highway
Morjim येथील मैदानाची दुरवस्था | GoamantakTV

निवेदनांना केराची टोपली

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग धारगळ ते महाखाजन तसेच पत्रादेवीपर्यंतच्या रस्त्यात ज्या दिवसापासून एमव्हीआर कंपनीने कामाला सुरवात केली. त्या दिवसापासून हे काम वादग्रस्त बनलेले आहे. या कंत्राटदाराने मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे दिसून येत आहे. हा कंत्राटदार कुणालाच जुमानत नाही. पेडणेवासीयांनी वेळोवेळी आवाज उठवला. सरकारला निवेदने दिली, तक्रारी केल्या.

Mumbai-Goa Highway
Morjim News: मोरजीतील भूमिका मंदिर देवस्थानच्या विहरीत पडला रेडा

शेवटी न्यायालयाकडेही दाद मागितली. न्यायालयाने कंत्राटदाराविरोधात एफआयआर नोंदवण्याची पोलिसांना सूचना केली. परंतु पोलिसांनीही यावर अजून काहीच कार्यवाही केली नाही.महामार्ग कंत्राटदाराच्या मनमानीने कळस गाठलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला, वाहन चालकांना हा कंत्राटदार वेठीस धरत असून सरकारचे त्यावर काहीच नियंत्रण नसल्याने जनता सरकारच्या नावाने रडत आहे.

- उमेश तळवणेकर,बहुजन समाजाचे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com