Morjim Fire: ..मोठी दुर्घटना टळली! मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात आग, युवकांच्या सतर्कतेमुळे आली आटोक्यात

Morjim Fire Incident: सुदैवाने स्थानिक युवक गौरेश बांदेकर, प्रमोद गावकर आणि गणेश सावळ यांनी वेळीच सतर्कता दाखवत हस्तक्षेप केल्याने आग आटोक्यात आली व मोठी दुर्घटना टळली.
Morjim Fire Incident
Morjim Fire IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात डोंगरावर असलेल्या देवस्थानाजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने स्थानिक युवक गौरेश बांदेकर, प्रमोद गावकर आणि गणेश सावळ यांनी वेळीच सतर्कता दाखवत हस्तक्षेप केल्याने आग आटोक्यात आली व मोठी दुर्घटना टळली.

जर ही आग संपूर्ण डोंगर परिसरात पसरली असती, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते. या भागात मोठ्या संख्येने वाहने पार्क केलेली असतात. आग वेळेत आटोक्यात न आणल्यास अनेक वाहने जळून खाक झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मोरजी खिंड परिसराचे पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत गार्डन, योगा सेंटर, मनोरंजनाची साधने, सुरक्षित फूड कोर्ट तसेच विविध स्टॉलसाठी जागा विकसित करण्यात आली होती. हा विकास तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या काळात करण्यात आला होता.

Morjim Fire Incident
Arpora Nightclub Fire: 'बर्च' मधील मृत कामगारांना मिळाली नाही नुकसान भरपाई, 'मानवाधिकार'कडून कामगार आयुक्तांना नोटीस

मात्र, सध्या या गार्डन व परिसराची अपेक्षित देखभाल होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराने गार्डन आणि परिसराचे सुशोभीकरण केले, त्याच कंत्राटदाराने हा परिसर भाडेपट्टीवर घेऊन येथे आपला व्यवसाय सुरू केला आहे.

Morjim Fire Incident
Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

सर्व तक्रारदारांना सुनावणीची माहिती द्या!

न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ‘जीसीझेडएमए’ला २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रकरण सूचीबद्ध करून २६ डिसेंबर २०२५ पूर्वी पुनर्विचार अर्जावर निर्णय देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सर्व तक्रारदारांना सुनावणीची माहिती देण्याचे आदेश दिले. जर ठरवलेल्या मुदतीत पुनर्विचार अर्जावर निर्णय होऊ शकला नाही, तर सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून याचिकाकर्त्यांच्या अंतरिम दिलासा देण्यासाठीच्या मागणीचा विचार करण्याचे निर्देशही ‘जीसीझेडएमए’ला देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com