Morjim constructions : समुद्रकिनाऱ्यांना संरक्षण कोण देणार?

बेकायदा बांधकामे : सीआरझेडचे उल्लंघन
Morjim constructions
Morjim constructionsGomantak Digital Team
Published on
Updated on

Morjim constructions : डोंगर, झरे, नाले, किनारे नष्ट करण्यासाठी मनुष्यजात सध्‍या युद्धपातळीवर कार्यरत आहे. निसर्गाला रोखण्याचे काम माणूस करत आहे. किनारी भागात तर सीआरझेडचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारण्यात येत आहेत. भरतीरेषेच्या 200 मीटरच्या आत कसल्याच प्रकारचे पक्के बांधकाम करता येत नाही व तसा नियम आहे. परंतु या नियमाला फाटा देत अनेकांनी मोठमोठी बांधकामे उभारायला सुरूवात केली आहे. विशेष म्‍हणजे त्‍याकडे स्थानिक पंचायतींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.

मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे-मांद्रे, हरमल, केरी हे समुद्रकिनारे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात. परंतु या किनाऱ्यांवर फेरफटका मारल्‍यास मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे दिसून येते. या किनाऱ्यांवर राजकीय आशीर्वादाने अतिक्रमण सुरू आहे. हे अतिक्रमण वेळीच रोखले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्‍यात येत आहे.

Morjim constructions
Morjim : बेकायदा घरे, दुकानांना २ टक्के टॅक्स लावणार

किनारी भागात असलेले वाळूचे तेंब, वनस्पती, मारवेल-केतकीची झाडे, खारफुटी व इतर झाडे पावसाळ्यात वाळूची झीज होऊ नये म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. भरतीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वादळ झाल्यानंतर समुद्राचे पाण्‍याला रोखण्याचं काम वनस्पती आणि वाळूची तेंबे करत असतात. परंतु पर्यटन हंगाम आला की या वनस्‍पतींसह वाळूच्‍या तेंबांचे व्यावसायिकांकडून सपाटीकरण करण्‍यात येते. हे प्रकार भविष्‍यात धोकादायक ठरू शकतात.

मोठ्या प्रमाणात पडझड व सपाटीकरण

पावसाळ्यात किनाऱ्यांवर ठिकठिकाणी झाडांची पडझड होते. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर सपाटीकरण सुरू आहे. ते जर वेळीच रोखले गेले नाही तर समुद्राचे पाणी लोकवस्तीत घुसून हाहाकार उडू शकतो.

Morjim constructions
Morjim Land Issue: मोरजी बनतेय समस्यांचे आगर; अतिक्रमणामुळे मोरजीचे अस्तित्व धोक्यात

ज्या पद्धतीने किनारी भागात अतिक्रमण चालू आहे, त्याच पद्धतीने डोंगर माळरानावरील निसर्गनिर्मित संपत्ती नष्ट करण्याचा जणू व्यावसायिकांनी विडाच उचलल्याचे दिसून येतेय. खुलेआम डोंगरकापणी होत आहे. त्‍याकडे नगरनियोजन खात्‍याचे दुर्लक्ष झाल्याने बिगरगोमंतकीय व्यावसायिकांची चांदीच झाल्याचे दिसून येतेय.

किनाऱ्यांवरील अतिक्रमणाला सर्वस्‍वी सीआरझेड कार्यालयच जबाबदार आहे. बांधकामाला तात्‍पुरता परवान दिला म्हणजे जबाबदारी संपत नाही. कोणीही सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम केले असेल तर ताबडतोब कारवाई होणे गरजेचे आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून सीआरझेमध्‍ये चाललेले अतिक्रमण भविष्याचा दृष्टीने घातक आहे.

- अमित सावंत, मांद्रेचे सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com