Morjim Beach: तेमवाडा-मोरजी येथे बीच बेड्सना 'ग्रीन सिग्नल'; कासवांना उपद्रव नाही

Morjim Beach Beds: दोन शॅकमध्ये २० मीटरचे अंतर; याशिवाय सूर्यास्तानंतर या खाटा काढून शॅकमध्ये ठेवण्याची अट
Morjim Beach Beds: दोन शॅकमध्ये २० मीटरचे अंतर; याशिवाय सूर्यास्तानंतर या खाटा काढून शॅकमध्ये ठेवण्याची अट
Morjim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तेमवाडा-मोरजी येथे शॅक परवानाधारकांना किनाऱ्यावर खाटा (बेडस्) घालता येणार आहेत. पर्यावरण मंत्रालयाने त्यासाठी आज हिरवा कंदील दाखवला आहे. पर्यटन खात्याने याविषयी पर्यावरण खात्याकडे विचारणा केली होती.

मोरजीच्या किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातीतील कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यामुळे तो भाग शांतता विभाग म्हणून सरकारने अधिसूचित केला आहे. तेथे शॅक परवानाधारक बीच बेडस घालू शकतील की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात होती.

यामुळे पर्यावरण खात्याकडे विचारणा करण्यात आली. पर्यावरण खात्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली. त्यांनी खात्याला सांगितले की दोन शॅकमध्ये २० मीटरचे अंतर असते. याशिवाय सूर्यास्तानंतर या खाटा काढून त्या शॅकमध्ये ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.

कासव रात्रीच्यावेळी अंडी घालण्यासाठी येतात त्यावेळी या खाटा नसतात. याशिवाय मोरजी येथे अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांच्या संख्येत वाढ होत असल्याने आजवर तेथे असलेल्या शॅक आणि खाटांचा उपद्रव कासवांना होत नसल्याचे दिसते. यामुळे शॅक परवानाधारकांना खाटा घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

पर्यावरण खात्याने आता शॅक परवानाधारक खाटा घालू शकतील असा निर्णय दिला आहे. भरती रेषेपासून ६०० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मोरजी येथे प्रतिबंध करण्यात आला आहे.

Morjim Beach Beds: दोन शॅकमध्ये २० मीटरचे अंतर; याशिवाय सूर्यास्तानंतर या खाटा काढून शॅकमध्ये ठेवण्याची अट
Morjim Mini Bridge: ..अखेर मोरजी येथील नव्या पुलाचे काम सुरू!

सूर्यास्तापर्यत परवानगी

मोरजी येथील किनाऱ्यावर धारण क्षमता अभ्यास अहवालानुसार ११ शॅकना परवानगी दिली जाते. एक शॅक परवानाधारक जास्तीत जास्त २० खाटा मांडू शकतो. यामुळे मोरजीत २२० खाटा मांडल्या जाऊ शकतात. त्या सूर्यास्तानंतर गोळा करून ठेवल्या पाहिजेत, अशी अट मात्र घालण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com