Morjim News : आगरवाडा-चोपडे पंचायतीत सोपो कराच्या वसुलीमध्ये घोळ

Morjim News : बनावट पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप
Morjim
Morjim Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim News :

मोरजी, आगरवाडा-चोपडे पंचायतीत पंचायत कर्मचाऱ्याकडूनच चुकीच्या पद्धतीने सोपो करवसुली होत असल्याने या निधीचा मोठ्या प्रमाणात गैव्यवहार होत असल्याचा आरोप माजी सरपंच सीताराम ऊर्फ अमोल राऊत यांनी केला आहे.

आगरवाडा-चोपडे पंचायतीत सोपो कराची वसुली पंचायत कर्मचारी करतो. मात्र, त्यासाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर सिरीयल नंबर (अनु. क्रमांक) नसल्याने तसेच पावतीची दुसरी प्रत (कॉपी) राहत नसल्याने दरदिवशी किती करवसुली होते याची खरी माहिती मिळत नाही. त्यामुळे या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो.

याविषयी पंचायतीने योग्य तो खुलासा करावा तसेच दिल्या जाणाऱ्या पावत्यांवर सिरीयल नंबर टाकावा. तसेच निवडणूक आचारसंहिता लागल्याने होऊ न शकलेली सोपो कराची पावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी माजी सरपंच सीताराम ऊर्फ अमोल राऊत यांनी केली आहे.

आपल्या मर्जीतील व्यक्तीला सोपो कराची पावणी मिळावी यासाठी पंचायत मंडळ सोपो कराची पावणी वेळेवर करीत नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला. पेडणे तालुका गट विकास अधिकाऱ्यांनी याविषयी चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Morjim
गोव्यात पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत 98254 मुलांना मिळाले 'दो बूंद जिंदगी की'

सोपो कराची वसुली करण्यासाठी प्रत्येक पंचायतीत सोपो कराची पावणी मार्च महिन्यात केली जाते. मात्र, आचारसंहितेमुळे सोपो कराची पावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोपो कराची वसुली पंचायत कर्मचारीच करीत होता आणि सोपो वसुली करताना दिल्या जाणाऱ्या पावतीवर नंबर टाकले जात नव्हते. त्यामुळे या सोपो करवसुलीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

- सीताराम राऊत, माजी सरपंच, आगरवाडा-चोपडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com