Drug Case: 22 लाखांचे कोकेन, 10 लाखांची रोकड अन् दिल्लीपर्यंत धागेदोरे! मोरजी कोकेन प्रकरणाला नवे वळण; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Morjim Cocaine Case: मोरजी येथील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमधून २२२.९२ ग्रॅम संशयित कोकेन जप्त केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी एका महिलेसह नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.
Morjim Cocaine Case
Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: मोरजी येथील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमधून २२२.९२ ग्रॅम संशयित कोकेन जप्त केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी एका महिलेसह नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. यापूर्वी दोन सेनेगाली नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या चार झाली आहे.

मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री विदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याची तपासणी करण्यासाठी मांद्रे पोलिस आणि ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’च्या पथकाने संयुक्त मोहीम राबविली. यावेळी ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमधील ‘एफ-०३’ खोलीत वास्तव्यास असलेल्या सेनेगलच्या बौबा सांबा (३१) आणि अलीऊ मुस्तफा (३१) यांच्याकडे कोकेनसदृश पांढरी पावडर आढळली.

Morjim Cocaine Case
Goa Politics: निवडणुकीचे वारे वाहू लागले! भाजप घराघरांत, विरोधक मात्र एकीच्या प्रतीक्षेत

जप्त पदार्थाची अंदाजे किंमत २२ लाख २९ हजार २०० रुपये असून, १० लाख ८५ हजार ३०० रुपयांची रोकड आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ३३ लाख १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

चौकशी आणि तांत्रिक निगराणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हळदोणा-नाचिनोळा येथील एव्हिली जॉन परेरा (३२) या महिलेचे नाव समोर आले. अमलीपदार्थांच्या कथित बेकायदा व्यापारातून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांत जमा करून पुढील व्यवहारांसाठी वापरली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली.

Morjim Cocaine Case
Goa Ring Road Plan: गोव्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'रिंग रोड'चा विचार! CM सावंत यांचे मोठे संकेत

गोवा पोलिसांची परराज्यात कारवाई

तपासासाठी पोलिसांचे पथक दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथे गेले होते. तेथे विल्यम उगोचुक्वू इझुचुक्वू या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याला २३ ऑक्टोबर रोजी मांद्रे पोलिस स्थानकात आणून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गिरींद्र नाईक आणि उपनिरीक्षक परेश काळे करीत आहेत. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि पेडणेचे उपविभागीय पोलिस अधिकारी आशीष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com