Stray Cattle: मोरजी किनारी भागात भटक्या जनावरांचा त्रास; पर्यटकांकडून नाराजी व्यक्त!

Morjim Beach: मोरजी तेमवाडा आणि विठ्ठलदासवाडा या दोन्ही किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे भटकत असतात.
Stray Cattle
Stray Cattle Dainik Gomantak

Morjim Beach: मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात पर्यटन हंगामात ज्या पद्धतीने देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते, त्याच पद्धतीने आता बेवारस किंवा पाळीव जनावरेही किनारी भागात ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसत आहे. मोरजी तेमवाडा आणि विठ्ठलदासवाडा या दोन्ही किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे भटकत असल्याचे दिसत आहे.

एका बाजूने पर्यटकांची गर्दी तर दुसऱ्या बाजूने मुक्या जनावरांचा कळप किनारी ठाण मांडून आहे. पंचायत किंवा सरकार यावर काहीच उपाययोजना करत नसल्याबद्दल पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसतात. पेडणे तालुक्यातील एकूण वीस पंचायती आणि पेडणे नगरपालिका क्षेत्रातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचे कळप ठाण मांडून वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि वाहतूक कोंडी करण्याचे काम करत आहेत.

Stray Cattle
Goa Crime : पर्वरीत रस्त्यावर उभ्या कारमधून लांबवले तब्बल 89 हजार रुपये; दोघे गजाआड

तसेच, समुद्रकिनारीही ठाण मांडून बसतात. स्थानिक पंचायती व नगरपालिकेने या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पेडणे पालिकेने 80 हजार रुपये खर्चून कोंडवाडा उभारला. 14 वर्षांपूर्वी या कोंडवाड्यात मोकाट गुरांना पकडून ठेवले जात असे. गुरांना पकडल्यावर त्याची देखभाल करण्यासाठी खास कामगारांची नियुक्त सरकारने त्या त्या पंचायत व पालिकेला करण्यासाठी अधिकार देऊन वर्षाला ठराविक निधी देण्याची तरतूद केली आहे.

तुटपुंज्या निधीमुळे गुरे कोंडवाड्याबाहेर

पेडणे तालुक्यातील जवळ जवळ सर्व पंचायतींकडे कोंडवाडे आहेत, मात्र ते कागदपत्रावर. सरकारकडून गुरे पकडणाऱ्या कामगारांना तुटपुंजी निधी पंचायतीकडे येतो. या निधीतून किती गुरे पंचायत पातळीवर पकडली असतील हा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी कोंडवाडे आहेत. मात्र, मोकाट गुरे त्या कोंडवाड्यात दिसत नाहीत. तुटपुंज्या निधीमुळे अनेक पंचायती व पालिकेने गुरे पकडण्याचा विषय सोडून दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com