Police custody of suspects in Panaji theft case
Police custody of suspects in Panaji theft caseDainik Gomantak 

Goa Crime : पर्वरीत रस्त्यावर उभ्या कारमधून लांबवले तब्बल 89 हजार रुपये; दोघे गजाआड

पर्वरीतील चोगम रोडवर एका कारमधून तब्बल 89 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.
Published on

पर्वरीतील चोगम रोडवर एका कारमधून तब्बल 89 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत. टेक्नो पार्क इमारतीत गोडाऊन असलेल्या हेरिटेज स्पिरिटसमोर ही व्हॅन उभी करुन ठेवण्यात आली होती. अज्ञातांनी कारमधून पैसे चोरल्याचे तक्रार प्रशांत शर्विया यांनी पर्वरी पोलीस स्थानकात दिली आहे. दि. 27 रोजी संध्याकाळी उशिरा ही तक्रार नोंदवण्यात आली असून पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे हेरिटेज स्पिरिट कंपनीचे ड्रायव्हर आणि दोन माणसे व्हॅनगाडीतून ग्राहकांना स्पिरीट देण्यासाठी गेले होते. त्यातून आलेले पैसे गाडीतच ठेवून पर्वरी कार्यालयातून आणखी स्पिरिट आणण्यास गेले असता त्यांच्या मागावर राहिलेल्या अज्ञातांनी व्हॅनमधील पैसे चोरले असल्याची तक्रार कंपनीचे मालक प्रशांत शर्विया यांनी केली आहे. 

Police custody of suspects in Panaji theft case
Goa Crime : फेक अकाऊंटवरुन अश्‍लील मेसेज पाठवणं पडलं महागात

पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू यांनी तातडीने हालचाल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी विक्रम राजपूत आणि अभिजीत विटकर हे मूळचे पिंपरी चिंचवड येथील असून सध्या पर्वरी भागात वास्तव्यास होते. या दोघांना संशयावरून चौकशीसाठी आणले असता आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे. याप्रकरणी निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com