Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Tourist Rush At Morjim Beach: अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच किनाऱ्यावरील चेंजिंग रूम, शौचालय आदी सुविधाही अपुऱ्या पडत असलेल्या दिसून आले.
Morjim Beach
Morjim Beach Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Beach :

मोरजी, सुटीचा दिवस असल्याने रविवारी मोरजीतील समुद्र किनाऱ्यांवर स्थानिक तसेच पर्यटकांनी प्रचंड गर्दी उसळली. मात्र येथील अरुंद रस्ते व पार्किंगची गैरसाय यामुळे येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले.

जागा मिळेल तिथे वाहने पार्क केल्याने अनेकजण वाहतूक कोंडीत अडकून पडले. मे महिन्यात राज्यातील अनेक नागरिक खाऱ्या पाण्याची आंघोळ घेण्यासाठी किनाऱ्यांवर येतात. गेल्या काही दिवसांपासून येथे खाऱ्या पाण्याची आंघोळ घेण्यासाठी लोकांची रीघ लागली आहे.

येथील टेंबवाडा किनारी भागात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. त्यामुळे काहीजण अभ्यास करण्यासाठी येथे भेटी देतात. त्यात रविवारी देशी विदेशी पर्यटकांचीही भर पडल्याने येथील व्यवस्था कोलमडली. येथील सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले होते. पार्किंगला जागा नसल्याने काहींनी आपली वाहने रस्त्यावर उभी केली, त्यामुळे कोंडीत अधिक भर पडली.

Morjim Beach
Goa Murder Case: पर्यटनाला वास्‍कोत आले, चोरीसाठी वृद्धेला ठार केले; 26 दिवसांनंतर आंध्रातील दोघांना अटक

तसेच किनाऱ्यावरील चेंजिंग रूम, शौचालय आदी सुविधाही अपुऱ्या पडत असलेल्या दिसून आले. चेंजिंग रूम नसल्याने महिलांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेकजण सरकारी यंत्रणांना दोष देत होते.

माेरजीतील पर्यटन विकासाकडे सरकारने गांभिर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. तसेच आवश्‍यक सुविधा उभारण्यासाठी पावले उचलायला हवी, अशी मागणी होत आहे.

अरुंद रस्ते, पार्किंगची गैरसाय

अरुंद रस्ते आणि पार्किंगची गैरसाय ही मोरजीतील सर्वात मोठी समस्या आहे. बेशिस्त वाढत चाललेल्या पर्यटन व्यवसायामुळे येथील मुळ समस्यांकडे स्थानिक पंचायत तसेच सरकारनेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अतिक्रमणामुळे किनाऱ्याला जोडणारे सर्व रस्ते अरुंद झाले आहेत, त्याचे परिणाम आता दिसत आहेत, असे काही सुजाण नागरिक सांगतात.

अंदाधुंद पर्यटन व्यवसाय

जग प्रसिद्ध मोरजी किनाऱ्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात, त्यामुळे ही किनारपट्टी सोन्याचे अंडी देणारी मानली जाते. स्थानिकांकडून जमीन विकत घेउन अनेकांनी येथे धंदा व्यवसाय थाटला आहे. काही विदेशी नागरिकांनी देखील येथे व्यावसायात जम बसवला आहे.

काही स्थानिकही छोटेमोठे व्यवसाय करून बक्कळ पैसा कमवत आहेत. यंत्रणांना हाताशी धरून अनेक गैरप्रकारही चालतात. त्यामुळे येथील मुळ समस्या अधिक गहन होत चालल्या आहेत. याचे परिणाम आज स्थानिकांनाच भोगावे लागत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com