Goa Spa Center : निम्मे मसाज पार्लर, स्पा यांचे ‘पॅकअप’

कळंगुट, पणजीत सर्वाधिक; पोलिसांच्या भीतीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
 Illegal Massage Parlour
Illegal Massage ParlourDainik Gomantak

Goa Spa Center : आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये ११७ मसाज पार्लर व स्पा पैकी अर्ध्याहून अधिक बंद आहेत. तर काहींचे परवाने संपलेले असून त्यांनी परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेत.

दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी या मसाज पार्लर व स्पा विरोधात धडक मोहीम सुरू केली होती. यानंतर किनारपट्टी भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्यांनी ते बंद केले होते. या व्यवसायासाठी आवश्‍यक परवाने नसल्याने ते बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हणजूण पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात अधिकृत नोंद असलेले 12 मसाज पार्लर व स्पा आहेत. त्यापैकी वागातोर समुद्रकिनारी असलेल्या क्लॅरिन्स डायना बिल्डवेल यांचा स्पा याचा परवाना जानेवारी 2023 पर्यंत आहे. मात्र, इतर 17 जणांच्या आरोग्य खात्याच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. त्यातील काहींनी आरोग्य तपासणीसाठी विनंती करून व्यवासय परवान्यासाठी अर्ज केला आहे. सर्वाधिक मसाज पार्लर व स्पा हे कळंगुटमध्ये (54) आहेत. त्यातील कांदोळी येथील ‘इनबॅलन्स स्पा’, सो माय रिसॉर्टसचा स्पा, श्रेम रिसॉर्टचा स्पा, एव्हग्रीन स्पा, निओमिस स्पा परवाना 1 डिसेंबर 2025 पर्यंत परवाना आहेत. त्यामुळे 54 पैकी 6 जणांकडे आरोग्य परवाना असून इतरांच्या परवान्याची मुदत गेल्यावर्षीच संपलेली आहे. त्याचे नुतनीकरण न करताच पोलिस मोहिम कारवाई होईपर्यंत सुरू होते. कारवाई सुरू केल्यावर या मालकांनी स्वतःहून ते बंद ठेवले. त्यांनी आता आरोग्य खात्याकडे परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

म्हापसा पोलिस स्थानकाच्या आवारात 3 मसाज पार्लर व स्पा आहेत. त्यापैकी इन डोअर स्पाचा परवाना 1 डिसेंबर 2022 पर्यंत असून इतर दोघांच्या परवान्याची मुदत मार्च 2020 मध्ये संपली आहे. जुने गोवे परिसरात मळार - दिवाडी येथे एकमेव देवया आयुर्वेद नॅचरल क्युअर सेंटर आहे. 2014 मध्ये सुरू झालेल्या या मसाज तथा स्पा साठी परवाना नाही. मात्र, कायमस्वरुपी ना हरकत दाखला आहे. कळंगुटपाठोपाठ राजधानी पणजीमध्ये 36 मसाज पार्लर व स्पा आहेत. यापैकी स्टार स्पा, द फर्न कदंब हॉटेल अँड स्पा, नियोमिस स्पा, जे. बी. ग्रेसियस स्पा, अटायर हॉटेल्स अँड रिसॉर्टस्, ए अँड ए सेलोन अँड स्पा यांचा परवाना अबाधित आहेत. उर्वरित 29 मसाज पार्लर व स्पा चालकांनी परावान्याच्या नुतनीकरणासाठी अर्ज केलेला आहे. तर इनस्टाईल स्पा मालकाने स्वतःहून परवाना मागे घेतला आहे.

पेडणे परिसरात दोनच मसाज पार्लर आहेत. त्यापैकी एकाचा परवाना फेब्रुवारी 2023 पर्यंत असून दुसऱ्याचा संपलेला आहे. पर्वरी परिसरात 9 मसाज पार्लर्स आहेत. त्यातील एकाचा परवाना ऑक्टोबर 2022 पर्यंत असून इतर 8 जणांच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. काहींनी परवानाच्या नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत तर काहींनी व्यवसायच बंद ठेवला आहे.

 Illegal Massage Parlour
Goa Congress Rebel : बोडगेश्‍वर महाराजा... खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा कर!

युवकांना मारहाणीनंतर कारवाई सुरू

1 ‘मसाज पार्लर्स व स्पा’च्या नावाखाली काही ठिकाणी अवैध कामे सुरू होती. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील तरुणांना झालेल्या मारहाणीनंतर ही गोष्ट समोर आली. त्यामुळे सरकारने पोलिसांना समाज पार्लर्स व स्पा यांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

2 त्यानुसार पोलिसांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मोहिम राबविली. यात अनेकांकडे आवश्‍यक परवाने नसल्याचे उघडकीस आल्यावर ते बंद करण्यात आले होते. अवैध मसाज पार्लर्सला टाळे ठोकण्यात आले.

परप्रांतीय तरुणींची फसवणूक

या व्यवसायात कामाला असलेल्या बहुतेक तरुणी या परप्रांतीय आहेत. त्यांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून दलाल गोव्यात आणून त्यांना मसाज पार्लरच्या व स्पा नावाखाली अनैतिक कामासाठी वापरण्यात येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com