Goa Congress Rebel : बोडगेश्‍वर महाराजा... खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा कर!

गोव्यातील काँग्रेसच्या 8 फुटीर आमदारांविरोधात नागरिकांचे गाऱ्हाणे
Bodageshwar Temple
Bodageshwar TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Rebel : स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचे खोटे वचन तसेच देवासमोर गाऱ्हाणे घालून मतदारांची फसवणूक केली आहे. त्या काँग्रेसच्या आठही आमदारांना येत्या आठवड्याभरात शिक्षा देत संबंधितांचा कायमचा सोक्षमोक्ष लावावा, अशा संतप्त भावनेने काही समाजसेवकांनी रविवारी सकाळी म्हापशातील प्रसिद्ध जागृत श्रीदेव बोडगेश्वर मंदिरात देवाला साकडे घातले.

समाजसेवक अनिल केरकर तसेच हळदोणातील रोहिदास शिरोडकर यांनी रविवारी देव बोडगेश्वर मंदिराला भेट दिली आणि भाजपात गेलेल्या त्या आठ काँग्रेसच्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी देवासमोर प्रार्थना करीत पुरोहितांमार्फत गाऱ्हाणे घालून घेतले.

विधानसभा निवडणूकपूर्वी देव बोडगेश्वरासमोर निवडून येताच, पक्षांतर करणार नाही अशी शपथ संबंधित काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी घेतली होती. त्यात या आठ आमदारांचाही समावेश होता. तरीही शपथ मोडत आणि देवाची तसेच मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या या खोट्या लोकप्रतिनिधींना तुच कठोर शिक्षा दे, अशा आशयाची प्रार्थना बोडगेश्वराला या समाजसेवकांनी केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना अनिल केरकर म्हणाले की, विकासासाठी आम्ही पक्षांतर केला असे सांगत आपल्या पक्षांतराचे हे आठही आमदार स्वतःची पाठराखण करीत आहेत. मुळात ते खोटे लोकप्रतिनिधी आहेत. अशांना देवाची सुद्धा भीती नाही. त्यांना देव बोडगेश्‍वरच योग्य शिक्षा देतील. आणि देवासह लोकभावनेस गृहीत धरणे काय असते ते त्यांना लवकरच समजेल.

Bodageshwar Temple
Digambar Kamat : दिगंबरना पंतप्रधान मोदींची लागलीच भेट; भाजपचे नेतेही चक्रावले

रोहिदास शिरोडकर म्हणाले की, देव बोडगेश्‍वरासारख्या जागृत देवस्थानात व पवित्र जागेत येऊन ते स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या शपथा घेतात. या लाचार आमदारांना आमचा देव योग्य ती शिक्षा देणार व सर्वांना योग्य जागा दाखवणार. त्याचप्रमाणे लोकांनी सुद्धा जागृत राहत, पैशांसाठी आपल्या किंमती मत विकू नये असे आवाहन त्यांनी केले.

समाजसेवकांनी बोडगेश्वर देवासमोर काँग्रेसच्या त्या आठ आमदारांच्या राजकीय घडामोडीच्या कृतीचा निषेध केला. तसेच देवासमोर नऊ केळी व पानविडा ठेवत गाऱ्हाणे घातले. ज्यांनी देवाची व मतदारांची फसवणूक केली, त्यांना योग्य शिक्षा व्हावी. आणि पुन्हा अशाप्रकारे खोट्या शपथा घेत लोकभावनेस ठेच पोहचविण्याचे धाडस कुणाकडून होऊ नये यासाठी देवा शपथ मोडणाऱ्यांना शिक्षा कर, असे साकडे देवाला घातले. या आठ आमदारांसह आणखी एक पानाचा विडा व केळी नवव्या व्यक्तीसाठी ठेवली. ज्याने या आमदारांसाठी पक्षांतर करण्यास मध्यस्थी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com