Goa Election : गोव्यातील 150 हून जास्त ठिकाणी भाजप समर्थक सरपंच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा दावा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election : पंचायत निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असून भाजपची ग्रामीण भागातली ताकद ही मजबूत दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘राज्यातील 150 पेक्षा जास्त पंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून येतील’ असा दावा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे.

‘राज्यात 80 टक्क्यांहून अधिक जनता ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागावर भाजपची पकड मजबूत आहे हे या निवडणुकीने स्पष्ट केले. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेले चार महिने मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत कुशलतेने काम करत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजपला कौल दिला असून आमच्या आमदार आणि समर्थक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप समर्थक निवडून आले आहे’ असे मत सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

CM Pramod Sawant
Goa Panchayat Election : पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांचा भ्रमनिरास, नव्यांना पसंती

2014 नंतर लोकसभा, जिल्हा पंचायत, नगरपालिका, विधानसभा आणि आता पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. हा राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वयंपूर्ण गोवा 2.0 या अभियानाचा परिपाक आहे. भाजपला विजयी केल्याबद्दल सर्व गोमंतकीयांचे जाहीर आभार. यापुढेही भाजप सरकार अंत्योदय पद्धतीने राजकारभार करेल, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com