Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

गेल्या 10 दिवसांत गोव्यात पेट्रोलच्या दरात 97.11 ते 98.08 रुपयांपर्यंत चढ-उतार होत आहे.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: जागतिक पातळीवर क्रुड तेलाच्या दरांवरून तेल कंपन्या दररोजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करत असतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये बदल होत असतात. शुक्रवारीही गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरात वाढ दिसून आली.

पेट्रोल दरात गुरूवारच्या तुलनेत गोव्यातील दरांमध्ये प्रतीलीटर 36 पैशांची वाढ झाली. उत्तर गोवा आणि पणजी येथे डिझेल दरात प्रतीलीटर 65 पैसे तर दक्षिण गोव्यात प्रतीलीटर 35 पैशांची वाढ झाली.

Petrol Diesel Prices
8th Pay Commission बाबत आली मोठी अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 44 टक्क्यांनी वाढणार!

गेल्या 10 दिवसांत गोव्यात पेट्रोलच्या दरात 97.11 ते 98.08 रुपयांपर्यंत चढ-उतार होत आहे. तुम्ही आज गोव्यातील इतर भागात पेट्रोलचे दर आणि मागील दिवसाच्या तुलनेत किंमतीतील बदल देखील तपासू शकता. पेट्रोलच्या किमतीत गोवा राज्याच्या करांचा समावेश होतो.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.47

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 90.03

Petrol Diesel Prices
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com