Mopa Airport Toll: मोपा टोलला पुढील वर्षापर्यंत 'ब्रेक', मंत्री कामत यांची नितीन गडकरींशी बोलणी; दिल्ली दौऱ्यात चार मंत्र्यांच्या भेटी

Mopa Airport Link Highway Toll: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या लिंक हमरस्त्यासाठी टोल आकारणी सुरू करण्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ठरविले होते.
Mopa Airport Link Highway Toll
Mopa Airport TollDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या लिंक हमरस्त्यासाठी टोल आकारणी सुरू करण्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ठरविले होते. मात्र, ही टोल आकारणी पुढील वर्षापर्यंत स्थगित ठेवली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तसा ‘शब्द’ दिल्याची माहिती गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या दिगंबर कामत यांनी केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेऊन टोल आकारणीबाबत चर्चा केली. ‘हा निर्णय आताच अंमलात आणू नये, अशी विनंती मी गडकरी यांच्याकडे केली आणि त्यांनी ती तत्‍वत: मान्य केली’, असे कामत यांनी सांगितले. ‘पर्वरी येथील उन्‍नतमार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

सध्‍या लोड चाचणी सुरू असून, मार्ग वेळेत सुरू करण्‍यास कोणतीही अडचण येणार नाही’, असेही कामत म्‍हणाले. सध्या दिल्लीच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले कामत यांनी सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच बंदरे व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेतली.

Mopa Airport Link Highway Toll
Goa Film City Demand: "गोव्यात फिल्म सिटी उभारा!", ESG सदस्य शर्मद पै रायतुरकर यांची मागणी

मडगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

कामत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मडगाव स्थानकाचा कायापालट करण्याचे आश्वासन वैष्णव यांनी दिल्याचे कामत यांनी सांगितले. जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासोबत ‘सागरमाला-२’ अंतर्गत गोव्यात राबविता येणाऱ्या नव्या प्रकल्पांबाबत चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Mopa Airport Link Highway Toll
Goa FDA Action: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

अवैध वजन-मापांवर नियंत्रणासाठी उपकरणे : गोव्यात वैध मापनशास्त्र अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी कामत यांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेतली. वैध मापनशास्त्र विभागासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, क्षेत्रीय तपासणीसाठी विशेष वाहने आणि अवैध वजन-मापांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. तसेच फिरत्या प्रयोगशाळेची उभारणी करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे कामत यांनी सांगितले.

दिगंबर कामत यांनी दिल्ली दौऱ्यात प्रमुख मंत्र्यांच्या भेटी घेऊन आपल्या खात्यांतर्गत नागरी सेवा सुलभीकरणासाठी केंद्राची मदत मागितली. राज्य रेल्वेविषयी पायाभूत सुविधांची उभारणी व कनेक्टिव्हिटीवर साकल्याने चर्चा झाली. दौऱ्यात खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही कामत यांच्यासोबत मंत्र्यांशी हितगुज केले. त्यात पर्वरी येथील उन्नतमार्गाचे १० सप्टेेंबरला होणारे लोकार्पण हा महत्त्वाचा मुद्दा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com