Mopa Airport: 'मोपा' विमानतळासाठी 'या' नावाला केंद्राकडून हिरवा कंदील? पंतप्रधान करणार अधिकृत घोषणा

मोपा विमानतळ नामकरणावरुन चर्चेला आता मिळणार पुर्णविराम
Mopa International Airport |Goa News
Mopa International Airport |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोपा विमानतळ नामकरणावरुन चर्चेला उधाण आले आहे. याला पुर्णविराम मिळणार आहे, कारण मोपा विमान तळाला गोव्याचे लाडके सुपुत्र व माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, या गोवा सरकारच्या भुमिकेला केंद्र सरकारने देखील आता हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Mopa Airport will be named after Goa's former Chief Minister late Manohar Parrikar)

Mopa International Airport |Goa News
Folk Festival 2022: गोव्याची संस्कृती, गावपण राखत.....; सभापती तवडकरांनी सांगितली गोवा विकासाची व्याख्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकारने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावाला पसंती देत तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होती. त्याला आता केंद्र सरकारनेही हिरवा कंदिल दाखवला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Mopa International Airport |Goa News
Goa Bus Stand: मडगावात नवे बसस्थानक उभारणार; प्रकल्पावर मंत्र्यांची दिल्लीत बैठक

मिळालेल्या माहितीनुसार मोपा विमान तळाच्या नामकरणासाठी पर्रीकर यांचे नाव समोर आले आहे. याची घोषणा मात्र अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आले असता करणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान आयुर्वेद परिषदेच्या निमित्ताने गोवा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी मोपा विमानतळ उद्धाटन आणि नामकरणाची घोषणा करणार असल्याचं सुत्रांनी माहिती दिली आहे.

मोपासाठी 'या' नावांची केली जाते आहे मागणी

मोपा विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, यांच्यासह जॅक सिक्वेरा, भाऊसाहेब बांदोडकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांचे नाव द्यावे अशी मागणी होत असताना नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यानावावर शिक्का मोर्तब झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com